No products in the cart.
तुका जाधव यांचे चरित्र प्रकाशन
कला लेखक आणि चित्रकलाविषयक चित्रपट तयार करणारे सी. एस. नाग यांनी चित्रकार तुका जाधव यांचे चरित्र ‘स्पार्क इन द डार्क’ हे इंग्रजीतून लिहिले आहे. तुका जाधव हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि एसएनडीटी विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक. आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात असताना आनुवंशिक दोषामुळे त्यांची दृष्टी गेली. या समस्येवर मात करून ते आपल्या अंतर्मनातील दृष्टीच्या साहाय्याने आजही चित्र रंगवत आहेत. त्यांच्या या संघर्षमय आयुष्यावर नाग यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन जर्मनी येथे झाले आहे. भारतातील प्रकाशन समारंभ हा दि २२ डिसेंबर २०२२ रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये येथे संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा प्रकाशन समारंभ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक श्री अद्वैत गणनायक यांच्या हस्ते होणार आहे. कलारसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सी.एस. नाग यांनी केले आहे.
‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी तुका जाधव यांच्याशी गच्चीवरील गप्पा या युट्युबवरील कार्यक्रमात प्रदीर्घ गप्पा गोष्टी केल्या होत्या. पुढील थंबनेलवर क्लिक करून ही प्रेरणादायी मुलाखत आवर्जून पहा.
Related
Please login to join discussion