No products in the cart.
- Home
- Uncategorized
- परीक्षेवर बहिष्कार
परीक्षेवर बहिष्कार
दि ३१ मार्च २०२३ पासून कला संचालनालयातर्फे एटीडी, फौंडेशन, जीडी आर्ट या अभ्यासक्रमांच्या वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र गेले तीस वर्ष विनाअनुदानित कला महाविद्यालयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही कला संचालनालयाने या मागण्यांवर कुठलीही कार्यवाही न करता हा विषय प्रलंबित ठेवल्यामुळे कला महाविद्यालयांनी परीक्षांवर बहिष्कार घातला आहे. मोजकी अनुदानित महाविद्यालयं सोडली तर महाराष्ट्रातील सर्वांच्या सर्व विनाअनुदानित कला महाविद्यालयांनी या परीक्षांवर बहिष्कार घातला आहे. कला संचालक, कला संचालनालय जाणीवपूर्वक कला महाविद्यालयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप कला महाविद्यालयांच्या संघटनेने केला आहे. कला महाविद्यालय संघटनेने विविध कला महाविद्यालयांनी जो बहिष्कार घातला आहे त्यांचे फोटो ‘चिन्ह’ला पाठवले आहेत.
कला महाविद्यालयांच्या मागण्या :
गेले तीस वर्ष कला महाविद्यालयांच्या फी वाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. संपूर्ण राज्यातील कला महाविद्यालयांच्या मागणीनुसार २६९०० रु हा शुल्क वाढीचा प्रस्ताव कला संचालकांच्या सहीने शासनास सादर करणे अपेक्षित होते . पण असा कुठलाही प्रस्ताव आपल्या सहीनिशी कला संचालकांनी कधीच पाठवला नाही आणि सदरील प्रश्नात चालढकल केली असा आरोप शिक्षकांकडून केला जातो.
तसेच शासकीय उच्च कला परीक्षा फी ही १२०० रुपये आकारली जाते. त्यातील ७० टक्के फी शासनाकडे जमा करावी लागते. आणि ३० टक्के रकमेत परीक्षेचा खर्च ( साहित्यासहित ) भागवावा लागतो. ३० टक्के फी मध्ये संपूर्ण परीक्षेचा खर्च संबंधित परीक्षाकेंद्राला भागवणे शक्य होत नाही. या प्रश्नावर कला संचालनालयातर्फे कुठलाही तोडगा काढला जात नाही. अनेक महाविद्यालयं वैयक्तिकरित्या पैसे जमा करून परीक्षेचा खर्च भागवतात.
३१ मार्च २०२३ पासून परीक्षा सुरु होत असताना परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र कला संचालनालय परीक्षा घाईगडबडीने आटोपण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
कला महाविद्यालयांच्या संघटनेने उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सभा व्हावी अशी मागणी कला महाविद्यालयांच्या संघटनेने केली होती. मात्र कला संचालनालयाकडून अशी कुठलीही सभा आयोजित केली गेली नाही. एवढंच काय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबद्दल कुठलेही शैक्षणिक धोरण कला संचालनालयाकडे सध्या नाहीये. सर्व प्रश्न, परीक्षा याबाबत वेळकाढूपणा करणे असेच धोरण कला संचालनालयाचे अवलंबिले आहे असं या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
कला महाविद्यालयांच्या संघटनेने उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सभा व्हावी अशी मागणी कला महाविद्यालयांच्या संघटनेने केली होती. मात्र कला संचालनालयाकडून अशी कुठलीही सभा आयोजित केली गेली नाही. एवढंच काय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबद्दल कुठलेही शैक्षणिक धोरण कला संचालनालयाकडे सध्या नाहीये. सर्व प्रश्न, परीक्षा याबाबत वेळकाढूपणा करणे असेच धोरण कला संचालनालयाचे अवलंबिले आहे असं या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
या सगळ्या गंभीर प्रशांवर चर्चा होऊन तोडगा निघावा यासाठी दि २९ मार्च २०२३ रोजी कला महाविद्यालय संघटनेने कला संचालकांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी कला महाविद्यालय संघटना आणि कला संचालक, कला संचालनालयातले जबाबदार अधिकारी यांच्यात एक सभा व्हावी अशी मागणी केली होती. अशी सभा आयोजित केल्या नंतरच बहिष्कार मागे घेण्यासंबंधी संघटना विचार करेल असे प्रतिपादन कला महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष भारत बोराटे यांनी केले आहे.
*****
Related
Please login to join discussion