No products in the cart.
बौद्ध पर्यटनावर विशेष अभ्यासक्रम
नागपूरच्या मधुकरराव वासनिक कॉलेजतर्फे विदर्भ परिसरातील बौद्ध पर्यटनावर विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषेत शिकवण्यात येईल. या अभ्यासक्रमात पर्यटन दौऱ्याचे आयोजन कसे करावे, विदर्भ परिसरातील बौद्ध स्थाने, त्यांचा इतिहास, स्थापत्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये करिअरची संधी मिळू शकते अशी माहिती कॉलेजतर्फे देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक महिन्याचा आहे. कोर्सचा कालावधी २८ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२३ असा आहे. एकूण फक्त ५० जागा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी अभ्यासक्रमाचे आयोजक डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याशी ९४२१७०६५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
*****
Related
Please login to join discussion