No products in the cart.
RPI प्रदेश सचिवपदी चंद्रकांत कांबळे
जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी चंद्रकांत कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. विद्यार्थीदशेत असताना कांबळे हे दलित पँथर संघटनेचे सक्रिय सदस्य होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अरुण कांबळे, रामदास आठवले यासारख्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. रिपब्लिकन पार्टीचे पोस्टर्स, बॅनर्स यांची निर्मितीही चंद्रकांत कांबळे करत असत. सुरुवातीच्या काळात रिपब्लिकन पार्टीच्या फोटोग्राफर पदाची जबाबदारीही चंद्रकांत कांबळे यांच्याकडे होती.
जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांची जीएस पदासाठी देखील निवड झाली होती. जीएस असताना जेजे स्कूल ऑफ आर्टला पदवी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन यशस्वी होऊन १९८१ साली जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु झाले.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. रिपब्लिकन पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल ‘चिन्ह आर्ट न्यूज’ परिवारातर्फे चंद्रकांत कांबळे यांना शुभेच्छा.
पॅलेट या आपल्या नव्या कार्यक्रमात ‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक चंद्रकांत कांबळे यांच्याशी लवकरच संवाद साधणार आहेत.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion