No products in the cart.
चिन्ह’चा नवा ‘यू ट्यूब’ कार्यक्रम
चिन्हच्या ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण यू ट्यूबवर अनेक मान्यवर चित्रकारांच्या मुलाखती पहिल्या. ‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चित्रकारांना बोलतं केलं. यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी चित्रकारांच्या मुलाखती घेणे सुरू केले. हे आम्ही आमचं यश मानतो. या निमित्तानं कला क्षेत्रातील गुणी कलावंतांची दखल घेतली जाते आहे हे आम्ही महत्त्वाच मानतो .
आता ‘चिन्ह’च्या कार्यकारी संपादक कनक वाईकर एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत. ‘कनक कनक पायल बाजे’ या यू ट्यूब कार्यक्रमात आपण तरुण कलाकार, डिझायनर्स, जाहिरात क्षेत्र गाजवणारे तरुण यांचा करिअर प्रवास जाणून घेणार आहोत. नवीन तंत्रज्ञानामुळे कला क्षेत्रातील मर्यादा संपून नवी नवी क्षेत्रे आता बीएफए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर मिळेलच पण जुने जाणते लोक तरुणाईचं काम बघू शकतील.
या कार्यक्रमाचा पहिला भाग शनिवारी म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता चिन्हच्या यू ट्यूब चॅनलवर प्रक्षेपित होईल. पहिल्या भागात आपण भेटणार आहोत अमोल ठाकूर या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबाद येथील माजी विद्यार्थ्याला. अमोल ने बीएफए पूर्ण केल्यानंतर थेट आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. तिथे ‘मास्टर्स इन डिझाईन’ पूर्ण केल्यानंतर तो आता रिलायन्स जिओ येथे व्हिज्युअल डिझाईन टीम लीड म्हणून काम करत आहे. त्याचा करिअर प्रवास आवर्जून बघा. विशेष म्हणजे कला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम आवर्जून दाखवा.
‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमाचा लोगो सिद्धेश नेरुरकर यांनी केला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
तुम्हालाही जर कला क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या तरुणांबद्दल माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यांना या कार्यक्रमात नक्कीच आमंत्रित करू.
उद्याच्या कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे. या लिंकवर क्लिक करून नोटीफाकेशन ऑन केलं कि संध्याकाळी सात वाजता तुम्हाला कार्यक्रम सुरु झाला आहे हे दिसेल आणि तुम्ही कार्यक्रम बघू शकाल.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion