No products in the cart.
सौरभ डिंगरे यांच्याशी संवाद
आज शनिवारी संध्याकाळी ७ वाजता कनक कनक पायल बाजे या कार्यक्रमात आपण चित्रकार सौरभ डिंगरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. एक चांगला चित्रकार असणं आणि आपल्या कलेचा यशस्वी ब्रँड बनवणे या दोनही वेगळ्या गोष्टी आहेत. फार थोडे चित्रकार आपल्या कलाकृतींचा ब्रँड तयार करण्यात यशस्वी होतात. तरुण वयातच आपला ‘मदालसा’ हा ब्रँड बनवण्यात यशस्वी झालेला आजचा आपला पाहुणा आहे सौरभ डिंगरे. सौरभ हा एक उत्तम चित्रकार आहेच पण त्याबरोबर त्याने आपला ब्रँड देखिल तयार केला आहे. इन्स्टाग्राम तसेच अन्य सोशल मीडियातून त्याने आपली चित्रे तसेच त्या चित्रांचा वेगवेगळ्या प्रोडक्ट्मध्ये रूपांतरित केलेल्या वस्तू जसे की साडी, पर्स, कॅलेंडर यांची यशस्वीरीत्या विक्री केली आहे. त्याच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चित्रं ही पारंपारिक विषयांवर आधारित आहेत. विशेषतः महाराष्ट्रीयन दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना या चित्रात आहेत. या चित्रांमध्ये एक प्रकारचा गोडवा आहे, तो कलारसिकांना खूप आवडतो आणि म्हणूनच सोशल मीडियावर सौरभला मोठा फॅन फॉलॉवर आहे. आपल्या चित्रांना प्रॉडक्ट मध्ये रूपांतरीत करून एक यशस्वी ब्रँड सौरभने कसा तयार केला हे जाणून घेऊया त्याच्या सोबतच्या आजच्या गप्पांमधून.
या कार्यक्रमाचा प्रीमिअर यूट्यूबवर होईल. खालील लिंकवर क्लिक करून नोटीफाय मी हे ऑप्शन क्लिक केल्यास तुम्हाला सात वाजता कार्यक्रम सुरु झाल्याची सूचना येईल. नंतरही तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता.
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion