No products in the cart.
महिंद्रा & जितेंद्रा – गप्पा जितेंद्र वसईकर यांच्याशी
आज शनिवारी ‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमात संध्याकाळी ७ वाजता आपण भेटणार आहोत महिंद्रा & महिंद्रा, बजाज यासारख्या नामवंत कंपन्यांच्या व्हिडीओ जाहिराती तयार करणाऱ्या जितेंद्र वसईकर यांना. जितेंद्र शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी. बीएफएनंतर त्याने आपलं करिअर ग्राफिक डिझाइनर पदापासून सुरु केलं. त्यांनतर व्हिझुअलायझर, आर्ट डिरेक्टर अशा पदांपर्यंत तो पोचला. इथेच न थाबंता त्याने स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. आज तो प्रतिथयश ब्रॅण्डच्या जाहिराती तयार करतो. महिंद्रा ट्रॅक्टरची जागतिक महिला दिनानिमित्त जितेंद्रनी तयार केलेली जाहिरात व्हायरल झाली. जितेंद्रच्या जाहिराती एवढ्या परिणामकारक असतात की खुद्द आनंद महिंद्रा आपल्या सोशल हॅण्डल्सवरून त्या शेअर करतात.
या मुलाखतीत आपल्या करिअर प्रवासाविषयी जितेंद्र बोलणार आहेतच त्याशिवाय भविष्यातील जाहिरात क्षेत्रात ट्रेंड्स, जाहिरात संस्था चालवताना येणारी आव्हाने याबद्दलही ते माहिती देतील. तेव्हा आज शनिवारी दि १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमात जाणून घेऊया जितेंद्रचा करिअर प्रवास. हा कार्यक्रम तुम्ही तर बघाच पण विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवा. आपली पुढची दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच यातून मार्गदर्शन मिळेल.
या कार्यक्रमाचा यूट्यूब प्रीमिअर संध्याकाळी सात वाजता होईल. खाली या कार्यक्रमाची लिंक दिली आहे. त्यावर क्लीक करून ‘नोटीफाय मी’ हे ऑप्शन क्लीक केले की यूट्यूब तुम्हाला संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रम सुरु झाल्याची आठवण करून देईल. नंतरही तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता.
****
Related
Please login to join discussion