No products in the cart.
मकरंद बक्षी यांच्याशी बातचीत !
या शनिवारी दि २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत फोटोग्राफर मकरंद बक्षी याला. मकरंद हा मूळचा ठाणेकर. अनेकजण शिक्षणानंतर युरोप अमेरिकेची स्वप्ने बघतात. पण मकरंदने मात्र निवड केली ती चीनची ! वेगळं काहीतरी करायचं हा त्याचा नेहमीचाच ध्यास. त्यानुसार आपली अमेझॉनमधली नोकरी सोडून मकरंदने थेट चीनमध्ये नोकरी पत्करली .
मकरंद हा ‘शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,’ औरंगाबादचा विद्यार्थी. त्यानं फोटोग्राफीमध्ये स्पेशलायझेशन केलं. सुरुवातीची काही वर्षे नोकरी आणि फ्रीलान्सिंग केल्यानंतर तो चीनला गेला. तिथे तो गेला ते कोरोना लॉकडाऊनच्या एक वर्ष आधी. नंतर कोरोना भयानक पसरला . या काळात मकरंदला भारतात काही परत येता आलं नाही. तो तिकडेच अडकला. हे सगळे अनुभव आणि मकरंदचा करिअर प्रवास याबद्दल आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत.
हा कार्यक्रम बीएफए करणारे विद्यार्थी विशेषतः ज्यांना फोटोग्राफी या विषयात रस आहे त्यांनी आवर्जून पाहावा . फोटोग्राफीचे भविष्य, या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याबद्दल मकरंदने खूप उपयुक्त माहिती दिली आहे. शिवाय चीनमधील करिअर संधी याबद्दलही आपल्याला या कार्यक्रमात माहिती जाणून घेता येईल.
या कार्यक्रमाचा प्रीमिअर शनिवारी संध्याकाळी सात वाजता होणार आहे. खालील लिंकवर क्लिक करून या कार्यक्रमाचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. म्हणजे कार्यक्रम सुरु झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. अर्थात हा कार्यक्रम तुम्ही नंतर कधीही बघू शकता.
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion