No products in the cart.
डी कॅड : वार्षिक प्रदर्शनाचे उदघाटन
डी कॅड कला महाविद्यालयात दि.१९/०२/२०२३ रोजी संकल्पन २०२३ या कला प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावर्षी ‘कोकण स्थापत्य’ या नावाने कला प्रदर्शन आणण्याचा प्रयत्न केला होता.कोकणातील जुनी मंदिरे,त्यामध्ये कोरलेली अनेक चित्रे,कोरीव लाकूड काम याचे नमुने घेऊन प्रवेशद्वार तसेच मंचाचे चित्रण करण्यात आले होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून सावर्डे स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के व विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे परीक्षण करण्यासाठी आलेल्या सर ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या सीमा गोंदाणे हे उपस्थित होते. यावेळी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कोकणातल्या कलाकारांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये श्री.रुपेश नेवगी, कुडाळ, श्री.उदय लिंगायत, रत्नागिरी, श्री.अजित गोसावी, लांजा यांचा संस्थाचे अध्यक्ष अजय पित्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला क्रेडारचे अध्यक्ष अजय पित्रे, ट्रस्टी सौ. भारती पित्रे, श्री. वरूण पित्रे, सेक्रेटरी विजय वीरकर, श्री. परीट सर, श्री.मांडवकर सर आदि मान्यवर उपस्थित होते. हे कलाप्रदर्शन १९ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या कलाप्रदर्शनाचा सर्व कलारसिकांनी आस्वाद घ्यावा असे डीकॅडचे प्राचार्य मराठे यांनी आवाहन केले आहे.
******
Related
Please login to join discussion