News

‘चिन्ह’तर्फे महत्वाचा खुलासा

‘कनक कनक पायल बाजे’ अर्थात ‘K2PB’ या कार्यक्रमात आम्ही अनेक तरुण चित्रकार, कमर्शिअल आर्टिस्ट यांची मुलाखत घेत आहोत. या मुलाखतींचा उद्देश बीएफए किंवा कला क्षेत्रात शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावे हा हेतू आहे. किती वेगळ्या क्षेत्रात काम करता येते, कला शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या काय काय शक्यता आहेत हे विद्यार्थ्यांना कळावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हा कार्यक्रम ‘चिन्ह’चे संस्थापक संपादक सतीश नाईक पदरचे पैसे घालून करत असतात. यात कुठलीही जाहिरात नसते हे मी सगळ्यात आधी नमूद करू इच्छिते. काल संध्याकाळी एक फोन आला होता. इथे मी नाव जाहीर करणार नाही, पण त्या व्यक्तीचं म्हणणं असं होते की अमुक व्यक्तीची मुलाखत तुम्ही का घेतली? अर्थात आम्ही मुलाखत घेतो ते त्या व्यक्तीच्या काहीतरी वेगळेपणामुळे. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की कला क्षेत्रात अधिक अनुभवी, अधिक दर्जेदार काम करणारे एकापेक्षा एक श्रेष्ठ कलावंत आहेत. पण मुळात या कार्यक्रमाचं स्वरूपच तरुणांना प्रोत्साहन देणे हा असल्याने वरील मुद्दा या कार्यक्रमासाठी गैरलागू आहे.

या कार्यक्रमात आत्तापर्यंत सहा मुलाखती घेतल्या आहेत. बहुतांश तरुण हे जेजेशिवाय इतर कॉलेजमधून शिकलेले आहेत. ज्या मुलांना जेजेमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांनी निराश न होता स्वतःच्या करिअरवर फोकस करावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आम्ही आधीही आवाहन केले होते आणि आताही करत आहोत की तुमच्या माहितीतही कला क्षेत्रात उत्तुंग झेप घेणारे तरुण असतील तर आम्हाला infochinhaartnews@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. योग्य वाटल्यास आम्ही त्यांचा ‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमात जरूर समावेश करू.
शेवटी ‘गुरु’ चित्रपटातलं वाक्य इथे नमूद करते “अगर लोग तुम्हारे बारे मी बुरा बोलना शुरू कर रहे है, तो समझो तरक्की कर रहे हो”

****

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही K2PB या कार्यक्रमाचे व्हिडीओ बघू शकता.

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.