No products in the cart.
चित्रकला स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्था इन्फिगो आय केअर सेंटर रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांचा संयुक्त विद्यमाने जांभा दगड अनोख्या विषयावर चित्रकला स्पर्धा अयोजित करण्यात आहे. या स्पर्धेसाठी एकूण तीन विषय देण्यात आले आहेत ते म्हणजे सडा परिसर, सड्यावरील जैवविविधता, सडा आणि माणूस.
स्पर्धेसाठी नियम व अटी पुढील प्रमाणे :
* चित्र कागदाचा आकार 11 इंच बाय 15 इंच मध्येच असावा.
* रंग माध्यम कोणतेही वापरता येईल.
* चित्र रचना स्वनिर्मित असावी. चित्राच्या मागे स्वतःचे नाव व संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक.
* स्पर्धेसाठी चित्रे पाठवण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.स्पर्धेसाठी एकूण तीन गट आहेत यात इयत्ता आठवी ते दहावी चा गट क्रमांक एक महाविद्यालयीन गट हा गट क्रमांक दोन आहे तर खुला गट हा गट क्रमांक तीन आहे. प्रत्येक गटाला वेगळी बक्षिसे असतील. त्यामध्ये पहिले तीन क्रमांक काढले जातील. पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला दहा उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळतील. विशेष सहभाग नोंदवणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये यांना विशेष बक्षिसासाठी तालुका पातळीवर निवड केली जाईल.
अधिक माहितीसाठी 9970245962 किंवा 9422635804 या क्रमांकावर संपर्क साधा.
Related
Please login to join discussion