No products in the cart.
शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या शैक्षणिक भेटीचे आयोजन
दि. १२ ऑक्टोबर रोजी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद येथील कला शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांची इतिहास संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि सोनेरी महाल येथे शैक्षणिक भेट आयोजित केली होती. कला शिक्षण प्रशिक्षण विभागाची अश्या प्रकारची पहिलीच भेट होती. कलेचा इतिहास, प्राचीन नाणी, मराठा, मुघलकालीन शस्त्र आणि वास्तुशास्त्र याबद्दल माहिती दिली. या भेटीत इतिहास संग्रहालयाच्या डॉ. अमोल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती आणि मूर्तीशास्त्रबद्दल माहिती दिली. मूर्ती मध्ये दागिने, केशरचना, कपडे यावरून त्याकाळी आपली संस्कृती कशी होती, याचा अभ्यास कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले. बेसाल्ट रॉक आणि लाइमस्टोन यातील फरक विद्यार्थ्यांना सांगितला. श्री. कुमार भवर यांनी मुघल कालीन, मराठा कालीन वस्तु, आर्किटेक्चर, डिझाईन आणि त्याचा विकास याबद्दल मार्गदर्शन केले.
सोनेरी महालाच्या भेटीदरम्यान मयुरेश खडके यांनी सोनेरी महाल हे नाव कसा पडले, त्या काळातील चित्रे, त्यामधील बारकावे समजून सांगितले. मराठा, मुघल कालीन हत्यारे, त्यांचा वापर याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. गोटे सर (अधीक्षक, राज्य पुरातत्व विभाग) यांनी शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपली कला आणि संस्कृती, त्यामध्ये काळानुरूप झालेले बदल याबद्दल मार्गर्शन केले. तसेच राज्य पुरातत्व विभाग आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद यांनी मिळून काही उपक्रम घेता येतील असे सांगितले. ही शैक्षणिक भेट कलाशिक्षण प्रशिक्षण विभागाच्या अश्विनकुमार जोगदंड यांनी व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता रमेश वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या उपक्रमास कला शिक्षण प्रशिक्षण विभागाचे प्रा. नारायण सोनावणे, प्रा. कैलाश घुले, प्रा. गजानन शिवणकर यांनी मदत केली.
महाविद्यालयातर्फे भविष्यात इतर विभागाच्या देखील अभ्यासक्रमानुसार अशा शैक्षणिक भेट आयोजित करण्यात येतील अशी माहिती अश्विनकुमार जोगदंड यांनी दिली.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion