No products in the cart.
पुण्यात ‘एलिगंझ’ प्रदर्शन
पुण्यातील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये ‘एलिगंझ’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन दि 25 ते 28 मे 2023 दरम्यान करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन चित्रकार अजय चांडक यांनी संयोजित केलं आहे.
या प्रदर्शनाचं उद्घाटन 25 मे 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजता, प्रशासकीय अधिकारी विक्रम कुमार आणि पीएमसीचे आयुक्त (पुणे महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. प्रख्यात कलाकार मिलिंद मुळीक यांच्यासह अनेक ज्येष्ठ कलाकार याप्रसंगी उपस्थित होते. या प्रदर्शनात भारतीय चित्रकारांसह सिंगापूर, कॅनडा आणि टांझानिया येथील चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
स्वयं-शिक्षित चित्रकारांना उत्तम व्यासपीठ मिळावं म्हणून संयोजक अजय चांडक यांनी प्रतिभावान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र आणलं आहे. ‘एलिगंझ’ या प्रदर्शनात चित्रं, शिल्पं आणि मिश्र-माध्यम कलाकृतींचा संग्रह रसिकांना पाहता येईल. प्रस्तुत प्रदर्शनामध्ये वास्तववादी, अलंकारिक, लोककला, सर्जनशील, संकल्पनात्मक, अमूर्त यासारख्या विविध शैलीतील कलाकृती रसिकांना पाहता येतील.
या प्रदर्शनात मिलिंद मुळीक, संजय देसाई, सुब्रत दास, संजीव जोशी, समिक डे, रबिन बार, प्रिन्कल मेहता, नीलम सेठिया, प्रणव शाह, विनय जोशी, रणजीत वर्मा, शबरी माहेश्वरी, स्मिता साहू, मंजुनाथ एस. जी के, मृणाल दत्त, वैभव गणेश, रश्मी घोष, दिलीप पुराणिक, सोनल सक्सेना, मोहिनी नेहारे, साश्वती देबनाथ, आरती कोरडे, निरंजन पाटगावकर, तुषार शेट्टी, महेंद्र कोंडेकर, रंजीता कुमार, अनघा देशपांडे, अदिती रे दत्ता, सोनाली, अजय चांडक हे स्वयं-शिक्षित चित्रकार सहभागी झाले आहेत.
Related
Please login to join discussion