No products in the cart.
विना अनुदानितच्या विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ
विना अनुदानित कला महाविद्यालयांनी उच्च कला परीक्षांवर बहिष्कार घातल्यामुळे शासनाने विना अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी म्हणून त्यांची सोय अनुदानित महाविद्यालयात केली होती. जवळच्या अनुदानित महाविद्यालयाच्या केंद्रावर जाऊन ते परीक्षा देऊ शकतील आशा आशयाचे एसेमेसही त्यांना पाठवण्यात आले होते. असे असले तरी विना अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे फक्त अनुदानित कला महाविद्यालयातील विद्यार्थीच परीक्षा देत आहेत असे कळते.
सूत्रांकडून असेही समजते की, आज संध्याकाळी उच्च शिक्षण मंत्र्यांबरोबर विना अनुदानित कला महाविद्यालयांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती बैठक होणार का? झाली तर त्यामध्ये काय तोडगा निघेल या प्रतीक्षेत कला महाविद्यालये आहेत असे समजते.
Related
Please login to join discussion