No products in the cart.
आनंद दिवाडकर यांचे प्रदर्शन
छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांचे ‘द केव्हज्’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कलादालन, काळा घोडा, मुंबई येथे दिनांक १५ ते २१ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता राजीव मिश्रा , संचालक महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, डॉ. संतोष क्षीरसागर, डीन, सर जे. जे. इन्स्टिट्युट ऑफ ॲप्लाइड आर्ट्स, आर्किटेक्ट पंकज कनल यांच्या हस्ते होणार आहे.
आनंद दिवाडकर हे नाव पुण्यातील आर्किटेक्ट आणि डिझाईन जगतामध्ये गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुपरिचित आहे. त्यांनी फोटोग्राफी केलेल्या अनेक डिझाईन या विषयावरील लेख नामांकित डिझाईन मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. आनंद यांची यापूर्वी पुण्यात तीन प्रदर्शने आयोजित झाली आहेत. त्यापैकी ‘आर्किटेक्चर ऑफ गोवा’ या प्रदर्शनाचे मिलिंद गुणाजी यांनी उद्घाटन केले होते. कालसमृद्ध महाराष्ट्राला या प्रदर्शनात पुन्हा नव्याने भेट देण्याची संधी या निमित्ताने मुंबईकर कलाप्रेमी रसिकांना मिळत आहे. कलात्मक अशा आर्किटेक्चरल फोटोग्राफी या क्षेत्रात काम करताना, प्रत्यक्षात आधीच सुंदर असलेल्या विषयाला, छाया, प्रकाश, पोत इत्यादी फोटोग्राफीत महत्वाच्या असणाऱ्या माध्यमांचा प्रभावी वापर करून पुनर्निर्मितीचा प्रत्यय रसिकांना मिळेल असा आनंद यांचा नेहमी प्रयत्न असतो.
******
Related
Please login to join discussion