No products in the cart.
देवदत्त पाडेकरांचे चित्र प्रदर्शन
दिल्ली येथे दि ४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान चित्रकार देवदत्त पाडेकरांचे ‘ब्लूम’ हे चित्र प्रदर्शन ‘गॅलरी गणेशा’ येथे आयोजित करण्यात आले आहे. देवदत्त पाडेकर २०१९ मध्ये स्विझर्लंड आणि फिनलंड या देशांमध्ये प्रवास करत होते. या काळात त्यांनी तिथल्या स्थानिक झाडांची आणि फुलांची बरीच चित्रे केली. यांनतर आला तो कोरोनाकाळ! कोरोनाकाळात देवदत्तच्या असे लक्षात आले की माणसांच्या कमी झालेल्या हस्तक्षेपामुळे झाडांना पूर्वीपेक्षा खूप अधिक बहर आला आहे. मग या निरीक्षणातून त्यांनी या बहराचीही चित्रे केली. चित्रातील किशोरवयीन मुलीदेखील या बहरासोबत सुंदररित्या जोडल्या गेल्या आहेत. कारण या किशोरीही उमलण्याच्या वयात आहेत. अशा दुहेरी बहराचा उत्सव बघण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे आवाहन देवदत्त पाडेकर यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी पाचपर्यंत असणार आहे.
प्रदर्शनाचा पत्ता :
गॅलरी गणेशा, इ – ५५७, ग्रेटर कैलाश – २, नवी दिल्ली – ११००४८
अधिक माहितीसाठी http://www.gallerieganesha.com/ या वेबसाईटवर संपर्क साधा.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion