No products in the cart.
जोतिबा पाटील यांचे चित्र प्रदर्शन
चित्रकार जोतिबा पाटील यांचे ‘कॉन्फ्लुएन्स’ चित्र प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, मुंबई येथे दि २० ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रस्तुत चित्रमालिकेत त्यांनी Colour Splash Technique चा व पॅलेट नाईफ चा कलात्मक वापर करून चित्र निर्मिती केली आहे. कॉन्फ्लुएन्स या शब्दाचा अर्थ संगम होतो. या अर्थाप्रमाणे या चित्रमालिकेत विविध रंगाच्या अमूर्त संगमातून वैश्विक शांतिची संकल्पना व सकारात्मकता तसेच आनंदी भावना ह्यांचे मनोज्ञ व विलोभनीय दर्शन होते. विविध ऋतूत साकारणारी निसर्गरूपे, त्यातील रम्यता आणि मानवी मनास दृश्यानंदासोबत मानसिक शांति व समाधान देणारे दृष्यपरिणाम तसेच कलात्मक, सौंदर्यपूर्ण अशी उत्कट भावनिकतेची अनुभूती या चित्रांमधून घेता येते. हिरवा, लाल, निळा, पिवळा, नारिंगी रंगांच्या कलात्मक लेपनातून त्यांनी ही चित्रे साकारली आहेत.
जोतिबा पाटील हे अमूर्त चित्रकार असून त्यांची अनेक प्रदर्शने मुंबई, ठाणे, कोल्हापूर वगैरे ठिकाणी आयोजित झाली आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन जोतिबा पाटील यांनी केले आहे.
Related
Please login to join discussion