No products in the cart.
जहांगीर मध्ये कुडलय्या हिरेमठ
चित्रकार कुडलय्या हिरेमठ यांचे ‘सिद्ध’ हे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि 17 ते 23 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हिरेमठ हे अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकल व समूह प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. हिरेमठ यांच्या चित्रांचं वैशिष्टय म्हणजे भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि त्यात प्राण्यांबद्दल व्यक्त केलेला आदर याला चित्र स्वरूपात कॅनव्हासवर दिलेलं महत्वाचं स्थान. गाय, नंदी आणि त्यांना पूजणारी माणसं ही हिरेमठ यांनी जलरंग आणि एक्रेलिक माध्यमात चित्रित केली आहेत. तेजस्वी रंगांचा वापर, प्रमाणबद्ध आकार आणि माध्यमावरील प्रभुत्व यामुळे ही चित्रं प्रभावशाली आणि मनमोहक भासतात. परंपरेनं चालत आलेल्या कथा, कविता यांचा मोठा तात्विक प्रभाव त्यांच्या चित्रांतून दिसून येतो. त्यामुळे या कथा, कवितेमधील प्रतिकांना ते महत्व देतात, कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर सजवतात.
हिरेमठ यांचे हे चित्र प्रदर्शन सकाळी 11.00 ते संध्याकाळी 07.00 वाजेपर्यंत खुले असेल.
****
Related
Please login to join discussion