No products in the cart.
जहांगीर मध्ये मिलिंद लिंबेकर !
दि ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रकार मिलिंद लिंबेकर यांचे ‘द वॉन्डरिंग शॅडो’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. मिलिंद लिंबेकर यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतून एमएफए पूर्ण केले आहे. बडोदे येथून त्यांनी आर्ट क्रिटीसिझम मध्ये एमए देखील केले आहे. मिलिंद यांची आतापर्यंत पाच एकल चित्र प्रदर्शने झाली आहेत. त्याचबरोबर देशभरातील अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ‘वॉन्डरिंग शॅडो’ या चित्रमालिकेत त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या फॉर्ममध्ये मोठ्या खुबीने नाट्यमयता आणली आहे. लिंबेकरांच्या चित्रांवर नाट्यकलेचा प्रभाव आहे. ‘वॉन्डरिंग शॅडो’ या मालिकेतील बहुतांश चित्रे ही ऍक्रेलिक माध्यमातील आहेत. दुःख, करुणा अशा अनुभवांचा प्रत्यय लिंबेकर यांच्या चित्रातून येतो.
हे चित्र प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असेल.
****
Related
Please login to join discussion