No products in the cart.
निलेश पालव यांचे प्रदर्शन
चित्रकार निलेश पालव यांचे ‘ऑप्टिमिस्ट’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि ३ ते ९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. निलेश पालव हे जेजे स्कूल ऑर आर्टचे माजी विद्यार्थी असून आपले कलेतील पद्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम सुरु केले. त्यांची चित्रे जगभरातील कला रसिकांच्या संग्रहात आहेत. निलेश पालव हे म्युरल आर्टिस्ट आहेत आणि कलाकृती रिस्टोरेशनचे कामही करतात.
निलेश यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे ब्रश स्ट्रोक्स हे लवचिक आणि नागमोडी आहेत. त्यांची चित्रे ही स्वछंद कल्पकतेचा अविष्कार असतात. प्रस्तुत ‘ऑप्टिमिस्ट’ या चित्र प्रदर्शनातील चित्र संकल्पना म्हणजे दैनंदिन आयुष्यात चित्रकाराला येणाऱ्या अनुभवांची चैत्रीक अनुभूती होय.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ असून रसिकांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन निलेश पालव यांनी केले आहे.
Related
Please login to join discussion