News

नीना सिंग यांचे प्रदर्शन

चित्रकार नीना सिंग यांच्या ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या मालिकेतील चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे १५ ते २१ नोव्हेंबर २०२२ ह्या कालावधीत आयोजित केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे.
नीना सिंग यांनी प्रस्तुत चित्रमालिकेत आपल्या कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण तसेच सौंदर्ययुक्त शैलीचा वापर करून तयार केलेली चित्रे निसर्गाची अमूर्त भावपूर्ण रूपे, त्यातील प्रासंगिक बदल, विविध ऋतूत साकारणारी त्याची रूपे, त्यातील दैवी शक्ती व निरामयता तसेच त्यात प्रकाशाचे असणारे महत्वपूर्ण स्थान आणि त्याचे अनन्यसाधारण महत्व फार कलात्मकतेने व प्रभावीपणे व्यक्त केले आहे. ही चित्रे त्यांनी कोविड-१९ च्या काळात साकारली असून सर्व प्रकारची अस्थिरता व बंधनयुक्त परिस्थिती आसपास असली तरी आपल्या अमूर्त चित्रसंपदेतून त्यांनी प्रत्येकाला मानवी आयुष्य प्रकाशरूपी ऊर्जेच्या रूपकाचा आधार घेऊन मुक्त मनाने जगण्याचा व त्याद्वारे सुखी जीवनाचा एक प्रभावी संदेश दिला आहे. निळा, हिरवा, लाल, पिवळा, नारिंगी, पांढरा व अन्य रंगसंगतीच्या कलात्मक समन्वयातून त्यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित अशा अनेक अनुभवांचा प्रतिकात्मक आधार घेऊन ह्या चित्रांची निर्मिती करताना त्यात सकारात्मक दृष्टिकोन, परिवर्तनशीलता, प्रत्येक प्रसंगातून व अशा तऱ्हेच्या नैसर्गिक बदलातून मानवाला मिळणारी अनुभूती आणि आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून पुढे जाण्याची जिद्द व वृत्ती अशा मनोधारणेचे उत्कट दर्शन घडविले आहे.

अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन नीना सिंग यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४००००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.