No products in the cart.
परमेश पॉल जहांगीरमध्ये !
पश्चिम बंगालचे चित्रकार परमेश पॉल यांचे १४ वे एकल चित्र प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि २७ मार्च ते ०२ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. परमेश यांचे चित्रविषय हे धार्मिक, अध्यात्मिक असतात. गंगा घाटावरील अध्यात्मिक सुंदर दृश्यांना ते आपल्या कॅनव्हासवर लाल, पिवळा, निळा हिरवा या रंगांच्या तेजस्वी छटांचा माध्यमातून अधिकच सुंदर रूपात मांडतात. अध्यात्मिक शहरांची जी विविध गूढ रूपे आहेत ती त्यांच्या चित्रांमध्ये अधिक गूढ भासतात. या रूपांमध्ये मंदिरे, शिव आणि त्यांचे वाहन नंदी अशा वेगवेगळ्या घटकांचं दृश्य स्वरूपातील सहभाग असतो.
पारंपरिक कुंभार कुटुंबात जन्मलेल्या परमेश पॉल यांचे बालपण पश्चिम बंगाल मधील नादिया गावात व्यतीत झाले. यांची चित्रं म्हणजे रसरशीत जिवंतपणा आणि अध्यात्मिकता यांचा सुंदर मिलाफ असतो.
लहानपणापासूनच त्यांनी टेराकोटा आणि मातीमध्ये देवतांच्या मूर्ती घडवण्याचे काम सुरु केले. कलाभिमुख वातावरणात त्यांच्या कलेच्या जाणीव समृद्ध झाल्या. त्यामुळे परमेश पॉल यांच्या लॅण्डस्केप्स आणि सिटीस्केप्स मध्ये अध्यात्म, शांतता, धार्मिकता यांचा दैवी संगम असतो. पॉल अध्यात्मिक मार्गावर प्रवास करताना मागील दहा वर्षांपासून इस्कॉनशी जोडले गेले आहेत त्यामुळे त्यांच्या चित्रात सर्व शक्तिमान ईश्वर, हिंदू मिथक कथा, अध्यात्मिक शहरे यांचे चित्रण असते. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत आहे.
***
Related
Please login to join discussion