News

पार्श्वनाथ नांद्रे यांचे ‘अनेकांत’ प्रदर्शन.

कोल्हापूरचे चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांचे अमूर्त चित्रशैलीतील ‘अनेकांत’ चित्रप्रदर्शन दि २१ मार्च ते २७ मार्च २०२३ दरम्यान जहाँगीर आर्ट गॅलरीत येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार प्रकाश वाघमारे आणि चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांच्या मातोश्री लक्ष्मी नांद्रे यांच्या हस्ते दि २१ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता होईल. आईच्या हाताने प्रदर्शनाचे उदघाटन करण्याचा हा एक वेगळा आणि कौतुकास्पद प्रयत्न आहे.

पार्श्वनाथ नांद्रे यांचे कलाशिक्षण कोल्हापूरच्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधून झाले आहे. अनेक वर्ष वास्तववादी चित्रशैलीत काम केल्यानंतर गेल्या कांही वर्षात त्यांनी अमूर्तशैलीत चित्रनिर्मिती करण्यास सुरुवात केली. प्रेम, आनंद, दुःख, करुणा, शांतता यासारख्या भवतालच्या अवकाशाच्या अनेक बाजूंच्या जाणिवा तसेच गेल्या सात आठ वर्षात अनुभवत असलेले समकालीन जगण्याचे भान यातून ते स्वतःची दृश्यभाष्य प्रक्रिया निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. सुखदुःखाच्या जाणिवांची समज निर्माण होण्यासाठी कविता, लिखाण, चित्र व शिल्प अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचा कला अभ्यास नवी दृष्टी देतो. हे भान सतत वृद्धिंगत व्हावे म्हणून विविध माध्यमांमधून त्यांनी चित्रनिर्मिती केली आहे.

त्यांनी जीवन व मृत्यू ही अवस्था अगदी जवळून  अनुभवली आहे. हॉस्पीटल मधील चांगले वाईट प्रसंग, लहानपणापासूनचे संस्कार, जैन तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या कलाकृतींचे प्रेरणास्थान आहेत. तीच अवस्था ते आपल्या चित्रातून मांडण्याचा प्रयत्न करत आहेत . आकार व अवकाशाची विभागणी, रंग , रंगसंगती, रंगलेपन याव्दारे ही दृश्यभाष्य प्रक्रिया ते सातत्याने पुढे घेवून जातात. यापूर्वीही त्यांची कांही एकल प्रदर्शने जहाँगीर आर्ट गॅलरी तसेच चंदीगड, दिल्ली , हैदराबाद, चेन्नई, पाँडिचेरी, कोल्हापूर, पुणे अशा विविध शहरात आयोजित झाली आहेत.

अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.