No products in the cart.
पिसुर्वो यांचे प्रदर्शन
चित्रकार पिसुर्वो उर्फ जितेंद्र सुरळकर यांचे चित्र प्रदर्शन जळगाव येथील वसंत वानखेडे कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन जैन इरिगेशनचे अशोक जैन यांच्या हस्ते झाले. जैन इरिगेशन हे कृषी उद्योगातील एक महत्वाचं नाव आहे. या कंपनीचे संस्थापक कै. डॉ. भवरलाल जैन यांना आदरांजली देण्यासाठी पिसुर्वो यांनी या प्रदर्शनाची संकल्पना मांडली. या संकल्पनेअंतर्गत भवरलाल जैन यांच्या ८५ व्या वाढदिवस वर्षानिमित्त ”A tribute to बडे भाऊ” हे ८५ चित्राचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आल आहे. या प्रदर्शनात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांच्या जीवनावर आधारीत चित्रे आणि पिसुर्वोचा मुंबई महापुरानंतरचा चित्रप्रवास (२००६ – २०२२) बघता येईल. त्याचबरोबर अंबाई, निंबाई,उमाई,गौराई,मुक्ताई, पावराय,भिवराई सप्तभगिनींच्या प्रतिकावर आधारित इन्स्टॉलेशन अर्थात मांडणीशिल्प या प्रदर्शनात पाहता येईल.
जळगावच्या कलाविश्वाला नवीन चैतन्य देणारा हा एक वेगळा प्रयत्न आहे. त्यामुळे कला रसिकांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन पिसुर्वो यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पिसुर्वो यांच्या कलाप्रवासावर आधारित गप्पा खालील लिंकवर क्लिक करून बघता येतील.
प्रदर्शनाची तारीख ६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.
Related
Please login to join discussion