No products in the cart.
पुण्यात ‘काळ्या निळ्या रेषा’ !
पुणे : चित्रकाराची कलाकृती पाहताना तो कुठल्याही वारशाशिवाय कसा काय कलावंत झाला, कुठल्या मातीतून आला हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. बऱ्याच चित्रकारांच्या चित्रांना शीर्षके असतात. ती त्यांच्या विचाराने दिली असावीत. परंतु ज्यांच्या चित्रांना शीर्षके नसतात. तरीही वेदनेच्या अंगानं सर्वदूर दिसणाऱ्या वास्तवाचं जगणं त्यात असतं. ते चित्रांच्या रेषांमध्ये पाहणारे एक अवलिया चित्रकार म्हणजे राजू बाविस्कर. राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या प्रदर्शनाचं पुणे येथे 21 ते 27 मे दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन राजहंस प्रकाशन, पुणेचे दिलीप माजगावकर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते झालं. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, राजहंस प्रकाशनचे संपादक सदानंद बोरसे, नामवंत चित्रकार प्रकाश वाघमारे, गणेश तरतरे उपस्थित होते. तसेच सुदर्शन आर्ट गॅलरीचे क्युरेटर श्री काळे सर, श्री.नितीन हडप, अतुल पेठे, माधुरीताई परांजपे आणि शहरातील बरीच चित्रकार, रसिक मंडळी या प्रसंगी उपस्थित होती.
सुदर्शन थिएटर, शनिवार पेठ पुणे इथं दि. 21 ते 27 मे दरम्यान दुपारी 04:00 ते सायंकाळी 08:00 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.
Related
Please login to join discussion