No products in the cart.
शोभा पत्की यांचे प्रदर्शन
शोभा पत्की यांचे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालन येथे दिनांक २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. सुमारे ४० वर्षांच्या कला प्रवासात त्यांनी काढलेल्या विविध विषयांवरील वेगवेगळ्या माध्यमातून व शैलीतील चित्रांचा या प्रदर्शनात समावेश केला आहे. शोभा पत्की यांचे कलाशिक्षण एम. ए. (आर्ट्स) पर्यंत पुणे येथे झाले. ती परीक्षा त्यांनी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर आपला कला प्रवास सुरू केला आणि आजवर ५० पेक्षा जास्त प्रदर्शनात भाग घेऊन विविध विषयांवर आधारित आपली चित्रे रसिकांसमोर सादर केली आहेत. जहांगीर कलादालनात त्यांचे हे ११वे चित्र प्रदर्शन आहे.
चित्र संवेदना जशी बाह्य अनुभवातून मिळते तशी अंतर्मनातही निर्माण होते. त्यामुळे प्रतिकात्मक व अमूर्त अशी चित्र निर्मिती चित्रकाराच्या अभिव्यक्तीतून होत असते. त्यासाठी साधना व चिंतन आवश्यक असून त्यांचा योग्य तो परिणाम चित्रात दिसून येतो, असे त्यांचे मत आहे. प्रस्तुत चित्र सादरीकरणात त्यांनी ज्यूट, प्लॅस्टर, कापड, माती, ॲल्युमिनियम, तेलरंग, मिक्स मिडियम वगैरे माध्यमांचा कलात्मक वापर केला असून आपली आशयघन चित्रे अपेक्षित व सौंदर्ययुक्त आविष्काराने अलंकृत केले आहेत. अनेक विविधलक्षी व आकर्षक विषयांवर आधारित असलेल्या त्यांच्या चित्रसंपदेत भारतीय संस्कृती व परंपरा, धार्मिक संकल्पना, निसर्गवैभव, ऋतुचक्र, रागमाला, ब्रह्मांड वगैरेंचे रम्य व आकर्षक दर्शन सर्वांना घडते.
अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन शोभा पत्की यांनी केले आहे.
प्रदर्शनाचा पत्ता:
जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४००००१
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion