No products in the cart.
‘वारसा’ तर्फे हस्तलिखितांचे प्रदर्शन
‘वारसा’ या संस्थेतर्फे झपुर्झा, पुणे येथे दि २९ एप्रिल २०२३ पासून पीएनजीच्या अजित गाडगीळ यांच्या संग्रहातील ऐतिहासिक हस्तलिखितांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या संयोजक मंजिरी ठाकूर आणि शर्मिला फडके या आहेत.
प्राचीन भारतीय हस्तलिखितांमधून वैविध्यपूर्ण लोकजीवन, चाली-रिती आणि ज्ञान, कला, साहित्याची समृद्ध परंपरा आपल्यासमोर उलगडली जाते. रामायण-महाभारताच्या पोथ्या, बौद्ध, जैन, हस्तलिखिते, धार्मिक ग्रंथ, पुराणे यांतून शेकडो हजारो पिढ्यांनी ज्ञान संपादित केले. त्यातील देखणी चित्रकला, आकृत्या, नैसर्गिक रंगकामांचे नमुने आजही प्रमाण मानले जातात. असंख्य लोककथा, लोकगीते आणि नाट्यांची बीजे यांच्यातून उमलली.
राजस्थानातील गरोडा लोकपरंपरा, महाराष्ट्रातील चित्रकथी, बंगालमधील पाला-पट्टचित्रकला आणि अशा असंख्य चित्रपरंपरांची मुळे या हस्तलिखितांमधून फ़ोफ़ावली. लयबद्ध अशा रंग-चित्र-आकृत्यांनी सजलेली ही अनेक मीटर लांबीची हस्तलिखिते न्याहाळणे नेत्रसुखद आहे. ग्रहतारे-राशींची मानवी रुपे आपल्या प्राचीन पूर्वजांची स्मृती जागवतात. नवग्रहांच्या या मनोहारी चित्रखेळातून हजारो वर्ष जपून ठेवलेले प्राचीन खगोलशास्त्र दृगोच्चर होते.
या कलाकृती प्राचीन आहेत, ऐतिहासिक आहेत, त्या अनेक प्रदेशांचे आणि काळांचे पट ओलांडून आपल्यासमोर साकार झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचे, त्या ’नैसर्गिक’ आहेत, ’पर्यावरणपूरक’ आहेत. नैसर्गिक साहित्यातून निर्माण केलेला ’कागद’, वस्त्र, वनस्पतीजन्य, नैसर्गिक रंग आणि कलाकारांचे हात, त्यांची कला तुम्हाला या प्रदर्शनातील प्रत्येक हस्त-कलाकृतीमधून जाणवेल. हस्तकलेचं, निसर्गनिर्मित साहित्याचं मोल या कालपटांमधून तुम्हाला जाणून घेता येईल.
हे प्रदर्शन पुढील आठ महिने झपुर्झा इथे सुरु राहणार असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.
I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Related
Please login to join discussion