NewsUncategorized

“नव्या चित्रपर्वाची सुरुवात !”

चित्रकार शरद आणि सुचिता तरडे यांनी पिंपरी चिंचवड येथील एकबोटे फर्निचर येथे पर्सेप्शन – 4′ या चित्रप्रदर्शनाचं आयोजन दि 20 ते 28 मे 2023 दरम्यान केले आहे. या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना अभिनव आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या चित्राकडे कोण लक्ष देईल अशी भावना प्रत्येक चित्रकाराच्या मनात असतेच. त्यामुळे गॅलरी पेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी कशी प्रदर्शने भरून रसिकांचे लक्ष जाईल याचा विचार शरद आणि सुचिता तरडे हे चित्रकार दांपत्य करत होते.

अशा प्रदर्शनामुळे चित्राकडे आपोआपच लक्ष जाईल आणि ते चित्र त्या घराच्या परिसरात कसे उत्तम दिसेल याची जाणीव लोकांना करून द्यावी हा विचार घेऊन तरडे यांनी हे प्रदर्शन सुहास एकबोटे यांच्या पुण्यातील चिंचवड तेथील फर्निचरच्या शोरूम मध्ये आयोजित केले आहे. चित्राबाबत एक जवळीकीची भावना प्रत्येक रसिकामध्ये असते. आणि तिचाच वापर करून सुबक रितीने सजविलेल्या फर्निचरच्या घरात आपली चित्रं कशी दिसतील याचं प्रात्यक्षिक करण्याचं तरडे यांनी ठरवलं. त्या योजनेची सुरुवात ‘Perception 4’  या प्रदर्शनाद्वारे  होत आहे. एखादं गॅलरीत बघितलेलं चित्र आपल्या घरी कसं दिसेल हे सर्वसाधारण माणसाच्या आकलना पलीकडची गोष्ट आहे कारण आपल्या घरच्या वस्तू त्याला योग्य आहेत का नाही याबाबतची जाणीव त्यांना नसते परंतु ज्या वेळेला एखाद्या बेडरूममधले सर्व फर्निचर आणि चित्र याचा अंदाज तुमच्या नजरेला एका दृष्टिक्षेपात येतो त्यावेळेला मात्र ते चित्र त्या सर्व फर्निचर समवेत कसं दिसेल हे लगेचच लक्षात येते. आणि कदाचित ते आवडते.  या आवडीचा भाग व्हावा, आपली चित्रं दुसऱ्यांच्या घरात कशी दिसतील याचं भानही चित्रकाराला यावं म्हणून हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. या प्रदर्शनात जवळजवळ लहान-मोठी 50 चित्रं असून काही शिल्पं, म्युरल आणि इन्स्टॉलेशन पण आहेत.

या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 88

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.