News

औरंगाबाद कार्यशाळेचा फियास्को?

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे डीन आणि कला संचालक यांच्या कल्पकतेतून (?) आकारास आलेला एक प्रोजेक्ट म्हणजे तीनही शासकीय कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या कलाकृतींचे फिरते प्रदर्शन आयोजित करणे व या प्रदर्शनादरम्यान  विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणे. नागपूरमध्ये या प्रदर्शनाची सांगता झाल्यानंतर हे प्रदर्शन औरंगाबादला आले होते. औरंगाबाद येथे या प्रदर्शनाचे उदघाटन साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांच्या हस्ते झाले.

या प्रदर्शनात पेंटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जेजे स्कूल ऑफ आर्टचा जबाबदार स्टाफ या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित होता. 

नियमाप्रमाणे प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी कला संचालकांनी औरंगाबादचे डीन यांना पत्र पाठवणे आवश्यक आहे. औरंगाबाद कॉलेजचे डीन वडजे यांची एमपीएससीतर्फे थेट ‘डीन’ म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे वडजे हे नियमाप्रमाणे साबळेंना सिनिअर आहेत. अशा वेळी जेजेचे डीन साबळे औरंगाबादचे डीन वडजे यांना कुठलेही आदेशात्मक पत्र पाठवू शकत नाहीत. त्यामुळे ही कार्यशाळा आणि प्रदर्शन औरंगाबादला आयोजित करण्यासाठी कला संचालकांनी पत्र पाठवणे अपेक्षित होते. कारण साबळे फक्त कला संचालक म्हणून ते पत्र पाठवू शकतात. तर यात गंमत अशी की साबळे सध्या कला संचालक आणि जेजेचे डीन या दुहेरी भूमिकेत असले तरी वडजेना पत्र त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टचे डीन म्हणून पाठवले होते.

औरंगाबाद कॉलेजने मुंबई आणि नागपूरवरून कार्यशाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अशी कुठलीही सोय करण्यात आली नाही. जी मुलं आली ती बिचारी पायऱ्यांवरती थंडीत कुडकुडत बसली. खरं तर औरंगाबादचे एक प्राध्यापक कॉलेजमध्येच राहतात तेव्हा त्या मुलांनासुद्धा कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये थोडी जागा देऊन ते मोठेपणा घेऊ शकले असते. पण त्यांनी ऐनवेळी विद्यार्थ्यांची कसलीही मदत केली नाही. म्हणजे आपण कॉलेजमध्ये आरामात राहायचं आणि विद्यार्थ्यांना थंडीत सोडायचं किती हा दुटप्पीपणा!

आता असे हे एवढे महान शिक्षक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार? फायनल इयरला पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना कुठलेही प्रात्यक्षिक न देता शिक्षकांचे तोंडाच्या वाफा दडवणे सुरू होते. आता शिक्षकांचा हा टाईमपास असा की कोणी म्हणतो मुलांनो तुम्ही अजिंठा शैलीमधून प्रेरणा घेऊन काम करा तर कोणी म्हणतो महान अशा लघुचित्र शैलीमधून प्रेरणा घेऊन काम करा. सगळी नुसती बडबड. काही मुलं ही अंतिम वर्षाची आहेत , काहींचा तर थिसिस पण पूर्ण होत आला आहे, मग अशा वेळी कशाला विद्यार्थ्यांना कन्फ्युज करायचं? आणि कार्यशाळेतल्या मार्गदर्शकांनी तरी असे कोणते दिवे लावलेत वरील चित्रशैलीमध्ये? 

 शिक्षकांचा हा टाईमपास बघून विद्यार्थीही हळूच बाहेर पडले आणि औरंगाबादच्या बाजारामध्ये टाईमपास करू लागले. औरंगाबादमध्ये बघण्यासाठी खूप काही आहे बरं का! 

खोटं वाटतंय? विचारा कार्यशाळेत सामील झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला!

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.