No products in the cart.
नाशिक कलानिकेतनमध्ये वादावादी!
चित्र चोरी प्रकरणामुळे नकारात्मक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नाशिक कलानिकेतन महाविद्यालयाचे पदाधिकारी आणि सभासद यांच्यामधील वाद सध्या विकोपाला गेले आहेत. दि १४ जानेवारी संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी यांच्यात कार्यकारिणीची बैठक झाली होती. सभासदांनी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मनमानी कारभाराविषयी जाब विचारला. त्याचबरोबर संस्थेची घटना, हिशोब आणि कागदपत्रे यांची मागणी केली. देवदत्त जोशी आणि चित्रकार आनंद सोनार यांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी तीन ते पाच हजार रुपयांची देणगी घेतली जाते मात्र त्याची पावती दिली जात नाही असा गंभीर आरोप केला.
काही दिवसांपासून संस्थेचे सभासदांमध्ये असंतोष धुमसत आहे. याची सुरुवात कला निकेतनमधून जी चित्रे चोरी गेली तेव्हापासून झाली आहे. या गंभीर घटनेमुळे संस्थेचे नाव बदनाम झाले असा आरोपही सभासदांनी केला. या बैठकीसाठी दिनकर जानमाळी, रघुनाथ कुलकर्णी हे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांना संस्थेचे सभासद प्रा. बाळ नगरकर , देवदत्त जोशी, आनंद सोनार, अरविंद बागुल यांनी हिशोबापुस्तकसहा अन्य कागद्पत्रणाची मागणी केली. आज ती सभासदांना मिळतील असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नाशिक कलानिकेतनच्या कार्यकारणी बैठकीच्या निमित्ताने संस्थेतील वाद आणि गैरकारभार आता चव्हाट्यावर आला आहे.
****
Related
Please login to join discussion