No products in the cart.
अभिनव कला महाविद्यालयाच्या सचिवांसह नऊ जणांवर गुन्हा !
पुणे येथील १० व्यक्तींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून अभिनव कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची मिळकत लाटण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे एक विश्वस्त अनिल देसाई यांनी स्वारगेट पोलीस ठाणे इथे पुष्कराज पाठक आणि इतर व्यक्तीविरुद्ध भा.द.वि च्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अन्तर्गत फिर्याद दिली आहे की, पुष्कराज पाठक यांनी बनावट कागदपत्रे बनवून या कागदपत्रांवर संस्थेचे माजी विश्वस्त भालचंद्र पाठक आजारी असताना त्यांची बनावट सही कागदपत्रांवर करून १८ सदस्यांना परस्पर आश्रयदाता म्हणून संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सहभागी करून घेतले.
फिर्यादीनुसार २००१ या वर्षात संस्थेच्या विश्वस्तांमध्ये मतभेद होते त्यावेळी भालचंद्र पाठक यांची विश्वस्तपदावरची नेमणूक रद्द झाली होती. याकाळात २००७ पर्यंत शासनाने विश्वस्त मंडळावर प्रशासकाची नेमणूक केली होती. यानंतर मात्र धर्मादाय आयुक्तांनी भालचंद्र पाठक यांच्याकडे कारभार सोपवला. २०१५ मध्ये भालचंद्र पाठक यांची तब्येत बिघडली. अशा अवस्थेत त्यांचा मुलगा पुष्कराज पाठक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून तीच धर्मादाय आयुक्तांकडे सादर केली आणि आयुक्तांनी कुठलाही तपास न करता ही कागदपत्रे मंजूर केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच पुष्कराज पाठक यांनी संस्थेचा कारभार करण्याचा कुठलाही अधिकार नसताना आणि सभासदांची परवानगी नसताना दैनिक सकाळमध्ये २०२२ साली नोटीस देऊन संस्थेच्या मिळकतींची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
आता जर या फिर्यादीमधील आरोपांमध्ये तथ्य असेल तर सरकारने वेळीच प्रकरणात लक्ष घालून पुणे येथील जुन्या कला शिक्षण संस्थेला वाचवायला हवे अशी प्रतिक्रिया कला वर्तुळातून येत आहे.
***
Related
Please login to join discussion