No products in the cart.
जून महिन्यातल्या ‘गप्पा’ !
‘गच्चीवरील गप्पां’च्या जून महिन्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत चार अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती ! ४ जून रोजी होणाऱ्या ८६व्या कार्यक्रमात ‘खेळ’ या अनियतकालिकाचे संपादक, लेखक, चित्रकार मंगेश नारायणराव काळे आपल्या आजवरच्या तिरपागड्या प्रवासाविषयी बोलणार आहेत. ११ जून रोजी होणाऱ्या ८७व्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पुरातत्व आणि संग्रहालय संचालक तेजस गर्गे महाराष्ट्राची या क्षेत्रातली सद्यस्थिती विशद करून सांगणार आहेत तर १८ जून रोजी होणाऱ्या ८८व्या कार्यक्रमात बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता, शिल्पकार डॉ. दीपक कन्नल हे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम ‘गप्पां’च्या अजिंठा मालिकेतील चौथा कार्यक्रम आहे. या गप्पांमध्ये डॉ. कन्नल यांनी ज्या वेरुळवर पीएचडी केली त्यात वेरुळविषयी तसेच अजिंठ्याविषयी विशेषतः डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्याविषयी अनौपचारिक गप्पा मारणार आहेत. तर या महिन्यातल्या शेवटच्या म्हणजे २५ जून रोजी होणाऱ्या ८९व्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, लेखक आणि चित्रकार माधव इमारते. या कार्यक्रमात अमृत नाट्यभारतीपासून जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि डॉ. अशोक रानडे यांच्यापासून चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यापर्यंतच्या असंख्य विषयांवर इमारते यांना बोलतं केलं जाणार आहे. आणखीन दोनच महिने म्हणजे १०० कार्यक्रम होईपर्यंतच हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमात आणखीन कुणी कलावंत सहभागी व्हावं असं आपणास वाटत असेल तर आम्हाला जरूर नावं सुचवा !
Related
Please login to join discussion