News

गायतोंडे आणि बाकीचे सगळे !

गच्चीवरील गप्पा ९५ 

येत्या १० ऑगस्टला गायतोंडे यांच्या निधनाला २१ वर्षं पूर्ण होतील . त्यामुळे ‘ गच्चीवरील गप्पा’च्या शेवटच्या टप्प्यात ‘ गायतोंडे ‘ यांच्या स्मृती जागवण्यासाठी ‘ चिन्ह ‘नं  ‘ गप्पा ‘ मध्ये एका अगदी  वेगळ्याच कार्यक्रमाचा अंतर्भाव केला आहे . आजच्या भारतीय लिलाव विश्वावर गायतोंडे यांचा प्रचंड प्रभाव आहे . भारतातल्या अगदी पहिल्या लिलावापासूनच  गायतोंडे यांच्या चित्रांच्या किंमती या प्रचंड वेगानंच वाढत गेल्या आहेत. हा वेग केवळ कलाक्षेत्रालाच नव्हे तर  साऱ्यांनाच थक्क करून टाकणारा आहे . हे सारं कसं घडलं असेल ? कसं घडत असेल ? यावर मात्र फारच थोड्यानीच अभ्यास केला असेल . त्यातलं एक प्रमुख नाव आहे ते म्हणजे गोव्याचे अमूर्त चित्रकार सुहास शिलकर .त्यांनी गायतोंडे यांच्या प्रत्येक चित्राचा अगदी बारकाईनं अभ्यास केला आहे . त्यांच्या चित्रातली अमूर्तता ,आकार अवकाशाचं विभाजन , रंगलेपनाचं तंत्र , त्यांच्या चित्र विचारामागचा अध्यात्मिक पाया इतकंच नाही तर लिलावामध्ये त्यांच्या चित्रांना लावली जाणारी बोली या साऱ्यावर शिलकर यांचं अतिशय बारकाईनं लक्ष असतं . नुसता प्रश्न विचारायचा अवकाश की त्या संदर्भातली सारीच्या सारी माहिती अक्षरश: क्षणार्धात शिलकर समोरच्याला सांगून गारद करून टाकतात .  म्हणूनच येत्या ६ ऑगस्टच्या शनिवारी ‘ चिन्ह ‘ नं सुहास शिलकर याना खास आमंत्रित केलं आहे ते या साऱ्याच संदर्भांत अगदी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठीच .आपल्या आवडत्या चित्रकाराच्या स्मृती जागवण्याचा हा एक वेगळा प्रयत्न आहे . आपणही यात अवश्य सहभागी व्हा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.