News

अभिनव ‘गणेश’ प्रदर्शन

‘आर्ट फॉर ह्यूमॅनिटी’ संस्थेतर्फे गणेशोत्सवात ‘अथ २०२२’ ही गणेश कलाकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर १० दिवस १० गणपती ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन हे नरिमन पॉईंट, मुंबई येथील बजाज आर्ट गॅलरीत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते दि २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.

‘आर्ट फॉर ह्युमॅनिटी ‘परिवाराची स्थापना २०१९ च्या कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त गरजू कुटुंबांना मदत करण्याच्या पवित्र भावनेने झाली. मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरीमध्ये भारतभरातील जवळजवळ ३०० पेक्षा अधिक चित्रकार शिल्पकारांनी ‘आर्ट फॉर हूयमॅनिटी’ ही संस्था एक चांगले सामाजिक कार्य करत आहे त्यातून समाजाला फायदा होणार आहे व आपलाही हातभार या समाजकार्यला लागेल हा दृष्टिकोन ठेवून आपल्या अमूल्य कलाकृती मात्र पाच हजार किमतीमध्ये या समाजकार्यासाठी उपलब्ध करून दिल्या. चित्रे व शिल्प विकून मिळणारी रक्‍कम  संस्थेने कुठलेही कमिशन न घेता ” नाम फाउंडेशन ” या संस्थेला सामाजिक कार्यासाठी दान दिली होती. तीन दिवसाच्या प्रदर्शनातून एकूण साडेसहा लाख एवढी रक्कम जमा झाली होती. ही रक्‍कम कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी ‘आर्ट फॉर ह्यूमॅनिटी’ संस्थेने उभी केली होती.

तसेच संस्थेने करोना काळात जेव्हा कलाकार घरी बसला होता तेव्हा त्यांची कला जागृत करण्यासाठी व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तीन दिवस एक कलाकार व त्याची एकूण नऊ चित्रे असे एकूण तीन चित्रकार यांच्यासह ‘माझे मत’ हे ऑनलाईन प्रदर्शन सुरू केले होते. त्याला सुद्धा कलाकारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन चालू असताना ‘अथ २०२१’ व ‘१० दिवस १० गणपती’ या प्रदर्शनाचा जन्म झाला . गणेशोत्सवाच्या दिवसात हे प्रदर्शन करायचे असे ठरले. हे प्रदर्शन आधी ऑनलाईन व नंतर ऑफलाईन अशा स्वरूपात कलाकारांसमोर आले. करोनाच्या बिकट परिस्थितीत कोणीतरी आपल्या मागे उभे आहे व आपल्याला प्रदर्शन रूपाने मदतीचा हात पुढे करत आहे ही भावनासगळ्याच चित्रकारांची झाली झाली होती त्यामुळे ‘अथ २०२१’ व ‘१० दिवस १० गणपती’ या दोन्ही प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. इथेही संस्थेने पेंटिंग विकले गेल्यावर कलाकाराकडून कुठल्याही प्रकारचे कमिशन घेतले नाही. संस्थेचा एकच उद्देश होता करोनाच्या काळात मानसिकरित्या खचलेल्या कलाकारांना नवनिर्मितीकडे नेणे. या उद्देशाने या प्रदर्शनाची सुरुवात झाली.
यावर्षीही “अथ २०२२” व” १० दिवस १० गणपती “हे प्रदर्शन ऑनलाईन व ऑफलाईन होत आहे. ऑफलाईन प्रदर्शन बजाज गॅलरीत २६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर होत असून अधिकाधिक कला रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आर्ट फॉर ह्यूमॅनिटी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता:
बजाज आर्ट गॅलरी,
ग्राउंड फ्लोर, बजाज भवन, २२९, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१.

(बातमीसाठी वापरलेली फिचर इमेज ‘आर्ट फॉर ह्यूमॅनिटी’ कडून साभार.)

*****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.