No products in the cart.
अथेन्स प्रिंट मेंकिंगकडून चित्रकारांसाठी सुवर्णसंधी
अथेन्स प्रिंट मेकिंग या जगप्रसिद्ध संस्थेकडून प्रस्थापित आणि नवोदित चित्रकारांसाठी मोलाची संधी
अथेन्स प्रिंटमेकिंग सेंटर, ग्रीस (Athens printmaking arts centre, pandolfini & siaterli, C.N.P.P) यांच्यातर्फे जगभरातील प्रस्थापित तसेच नवोदित चित्रकारांना आपल्या कलाकृती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अथेन्स प्रिंटमेकिंग सेंटर तर्फे प्रिंटमेकिंग माध्यमात व्यक्ती चित्रण (self portrait) यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यानिमित्त जगभरातील चित्रकारांना आपले प्रिंट मेकिंग यामाध्यमातील ‘सेल्फ पोर्ट्रेट’ पाठवण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
याबाबत काही प्रश्न असल्यास info@athens-printmaking.com या इमेल आयडीवर “Self Portrait -Name/Surname” हे Subject line मध्ये नमूद करून संपर्क साधता येई शकेल. त्याचबरोबर या स्पर्धेबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या Facebook आणि Instagram वर मेसेज पाठवता येईल.कलाकृती पाठवण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. १९७७ साला पासून कार्यरत असलेली अथेन्सप्रिंट मेकिंग ही संस्था आर्ट आणि प्रिंटमेकिंगसाठी एक खुली कार्यशाळा म्हणून ओळखली जाते.
या प्रदर्शनासंबधी अधिक माहिती खालील वेबसाईट लिंकवर मिळू शकेल.
https://athens-printmaking.com/en/2022/07/18/open-call-2022/
Related
Please login to join discussion