No products in the cart.
ग्रेड परीक्षेचा निकाल डाउनलोड करण्याची सुविधा
कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२२ चा निकाल अनुक्रमे दि १६ जानेवारी २०२३ व १९ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या परीक्षेचे दुय्यम निकालपत्रक आणि परिपत्रक डाउनलोड करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ होती. पण या कालावधीत अनेक परीक्षाकेंद्र हे निकालपत्र डाउनलोड करू न शकल्याने ही लिंक पुन्हा सुरु करावी अशी मागणी वारंवार कला संचालनालयाकडे होत होती.
या मागणीचा विचार करून कला संचालनालयाने नव्याने निकाल डाउनलोड कारण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये या परीक्षेचा दुय्यम निकाल व प्रमाणपत्र केंद्र प्रमुखांच्या लॉगिनवरून डाउनलोड करण्याची सुविधा दि ३१ मार्च २०२३ पर्यंत दुपारी पाच वाजेपर्यंत देण्यात येत आहे.
तसेच प्रमाणपत्रामधील नावामध्ये दुरुस्ती असल्यास अशा दुरुस्तीकरिता दिनांक ३१.०३.२०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने केंद्रामार्फत अर्ज सादर करता येईल . निकाल पडताळणी करिता ज्या केंद्रांनी ऑनलाईन अर्ज शुल्कासह भरले आहेत . अशा विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल संबंधित केंद्रप्रमुखांच्या लॉगइनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . तरी केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्याच्या श्रेणीमध्ये बदल झाले असल्यास सदर प्रमाणपत्र दिनांक ३१.०३.२०२३ पर्यंत डाऊनलोड करता येईल .
दिनांक ३१.०३.२०२३ नंतर लिंक बंद करण्यात येणार असल्यामुळे ज्या केंद्रांनी दुय्यम निकालपत्रक व प्रमाणपत्र अद्याप डाऊनलोड केलेले नाही अशा सर्व केंद्रांनी निकालपत्रक व प्रमाणपत्र तात्काळ डाऊनलोड करुन जतन करुन ठेवावे तसेच प्रमाणपत्र संबंधितांना वितरीत करण्यात यावे . यानंतर येणाऱ्या अर्जाचा / विनंतीचा विचार नाही . याची कृपया नोंद घेण्यात यावी .
***
Related
Please login to join discussion