No products in the cart.
असा शिक्षक होणे नाही!
भारताची स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात होती तेव्हा सगळीकडे राष्ट्र निर्मितीची आदर्श स्वप्नं रंगवली जात होती. स्वातंत्र्य दृष्टीपथात दिसत होतं, त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र उभारणीसाठी आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी अनेकांनी स्वतःचं घर, संसार, पद, प्रतिष्ठा ठोकरून सेवाव्रत हाती घेतलं. यातून साने गुरुजी, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारखे सेवाभावी आदर्श शिक्षक या महाराष्ट्रास पाहावयास मिळाले.
पुढं मात्र स्वातंत्र्य मिळवून भारत तारुण्यात प्रवेश करू लागला तेव्हा ही आदर्श स्वप्नं धुळीस मिळाली. शिक्षण हे सेवाव्रत न राहता एक बिझनेस झाला. अनेक भव्य दिव्य फाईव्ह स्टार शाळा महाविद्यालये अमाप फी घेऊन विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट शिक्षण देऊ लागली. पण हे सर्व शिक्षण मूठभर धनिकांच्याच आवाक्यात आलं. बाकी गरीब विद्यार्थ्यांचं काय ? अशा वेळी काही मोजके सेवाव्रती शिक्षक मात्र अजूनही आपल्या संस्थेसाठी अविरत झटत असतात. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालयाचे डीन आदरणीय रमेश वडजे सर. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ बहुदा समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. त्यात ते स्वत: आपल्या पदाची तमा न बाळगता आपल्याच शासकीय कला महाविद्यालयात गवंडी काम करत आहेत.

कदाचित शासन संस्थेला पुरेसा निधी देत नसावं त्यामुळे डीन साहेबांवर ही वेळ आली असावी. काही महिन्यापूर्वी याच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये अपुऱ्या असलेल्या सुविधांविरोधात संप केला होता. त्यात एक मागणी अशी होती की महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागात टॉयलेट नाही. महाविद्यालय अतिशय अस्वच्छ असतं वगैरे वगैरे. आता या कामासाठी कदाचित कामगार मिळत नसावेत किंवा शासनानं निधीच दिला नसावा त्यामुळे डीन संपातील एका विद्यार्थ्याला हाताशी धरून स्वत: गवंडीकाम करत आहेत.
हे दृश्य बघून आम्ही खरंच हळहळलो. या कलियुगात असे सेवाव्रती प्राध्यापक बघून डोळे भरून आले. खरं तर या सेवेसाठी डीन साहेबांनाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा. कारण अशी माणसं हल्ली दुर्मिळ झाली आहेत. डीन साहेबाना अशी काम करावी लागत आहेत म्हणूनच तर शिकवण्यासाठी वेळ मिळत नाहीये. यावर्षी शासकीय कला महाविद्यालयाचे प्रदर्शन वेळेवर झाले नाही म्हणून केवढा गहजब आम्ही केला. आता हा व्हिडीओ बघून आमच्या लक्षात आले की डीन साहेबाना जर अशी कामं करावी लागत असतील तर ते कॉलेजच्या प्रशासनाकडं लक्ष तरी कधी देणार ? कसा पूर्ण होणार अभ्यासक्रम ? परीक्षा तरी कशा होणार ? आणि वार्षिक प्रदर्शन तरी कसं कार्यक्षमपणे आयोजित होणार ?
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण खात्यानं, कला संचालनालयानं आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ जरूर बघावा. आणि शासकीय कला महाविद्यालयाला आवश्यक तो निधी जरूर पोहोचवावा अशी आम्ही विनंती करतो. जेणेकरून ‘सेवाव्रती’ डीन साहेब अशा क्षुल्लक कामांमध्ये गुंतून न राहता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतील. आगामी शैक्षणिक वर्षाचं नीट नियोजन करतील.
*****
Related
Please login to join discussion