No products in the cart.
नेहरु सेंटरमध्ये हिना भट
चित्रकार हिना भट यांचे ‘व्हिसेरल रिआल्म्स’ हे एकल चित्र प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे दि 04 एप्रिल ते 10 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थचे सीईओ आशिष शंकर यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार आणि निवृत्त प्राध्यापक अनंत निकम, जेजे स्कूल ऑफ आर्टचे डीन विश्वनाथ साबळे, चित्रकार प्रकाश घाडगे, चित्रकार मिलिंद मुळीक उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे आजच्या जगात आमूलाग्र बदल झाला आहे. निसर्गाचे सौन्दर्यही पिक्सलच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या बघितले जाऊ लागले आहे पण जे खरं सौन्दर्य आहे ते फक्त मानवी भावनाच टिपू शकतात, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी त्याला मानवी स्पर्श कसा येईल ?
हिना भट यांच्या प्रस्तुत प्रदर्शनात याचं निसर्गाचं गूढ सौन्दर्य सूक्ष्म रुपात टिपण्याचा सुंदर प्रयत्न केला गेला आहे. मानवी जीवन हे निसर्गाच्या उपस्थिती शिवाय अपूर्ण आहे. रोज आपण जी झाडे, त्यांची मुळं बघतो त्यांचं सूक्ष्म चित्रण हिना यांनी कॅनव्हासवर केलं आहे. हे पाहिल्यावर आपल्याला जाणवतं की आपण काय हरवत आहोत आणि निसर्गाकडे आपण अधिक गंभीरपणे पाहू लागतो. निसर्गाचं सौन्दर्य आणि महत्व समजण्यासाठी हे प्रदर्शन आवर्जून बघावे.
हे प्रदर्शन 10 एप्रिलपर्यंत सकाळी 11:00 ते सायं 07:00 वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य बघता येईल.
***
Related
Please login to join discussion