News

जेजेच्या ऐतिहासिक डीन बंगल्यात अवैध वर्ग सुरु

रे वर्कशॉपच्या रिस्टोरेशनचे काम सुरु असल्याने जेजे स्कूल ऑफ आर्टचे आर्ट अँड क्राफ्ट विभागाचे सर्व वर्ग हे ‘डीन’ च्या बंगल्यात सुरु आहे. नियमांचा विचार केला असता ही ऐतिहासिक वास्तू पुरातत्व खात्याची परवानगी न घेता वापरणे अवैध आहे. डीनचा बंगला हा ऐतिहासिक वारसा असून तो पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथे कुठलेही काम किंवा वर्ग घ्यायचे असतील तर आधी पुरातत्व खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कुठलीही परवानगी न घेता हे वर्ग डीनच्या बंगल्यात सुरु झाले आहेत. डीनच्या बंगल्याची वास्तू ही सुमारे १५० वर्ष जुनी असून अतिशय नाजूक अवस्थेत आहे. ती जर मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामकाजासाठी वापरली तर तिची अपरिमित हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वास्तूची अवस्था नाजूक असल्याने २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा वावर तिथे असल्याने एखादा अपघातही होऊ शकतो.

पण या सर्व शक्यतांनाच विचार न करता आणि पुरातत्व खात्याला कुठलीही माहिती न कळवता किंवा त्यांची परवानगी न घेता ही इमारत सर्रास जेजे स्कूल ऑफ आर्टकडून वापरली जात आहे. काही दिवसापूर्वी हा डीनचा बंगला पुरातत्व खात्याला अंधारात ठेऊन जेजे स्कूल ऑफ आर्टच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शूटिंगसाठी दिला होता. त्यावेळी पुरातत्व खात्याने संस्थेला नोटीस बजावली होती. त्यावर उत्तर म्हणून भविष्यात डीन बंगल्याचा वापर पुरातत्व खात्याला विचारल्याशिवाय केला जाणार नाही अशी लेखी हमी संस्थेच्या प्रमुखांनी दिली होती. आणखी एक बेजबाबदार वर्तन म्हणजे याच बंगल्याचा एक भाग जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेच्या अखत्यारीत येतो. पण स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठात्यांनी जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टच्या अधिष्ठात्यांची परवानगी न घेताच तेथे वर्ग भरवले असल्याचे कळते.

पुरातत्व खाते आता या विषयाची शहानिशा करून जेजे स्कूल ऑफ आर्टला नोटीस बजावणार आहे असे देखील कळते.

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.