No products in the cart.
काल्पनिक की सत्यकथा ?
कोण म्हणतं कलासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना
किस्सा असा आहे की . जेजेतल्या संपाची काळजी वाटून कला संचालनालयातले एक सेवानिवृत्त अधिकारी अत्यंत अस्वस्थ झाले . ( कोण म्हणतं कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या कला शिक्षणाची चिंता नाही ? ) आणि त्यांनी थेट कला संचालनालयातच धावच घेतली . जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली . ख्याली खुशाली विचारली . विचारांचं आदान प्रदान केलं . डिनोव्हो आता झाल्यात जमा आहे मग कला संचालनालयाचं आता काय होणार या प्रश्नानं ते बिचारे अस्वस्थ झाले होते . जुन्या सहकाऱ्यांशी चर्चा करता करता , सुख दुःख समजावून घेता घेता संध्याकाळ कधी आणि कशी झाली ती त्यांना कळलंच नाही .एव्हाना डोक्यात सायंकालीन घंटी वाजू लागली होती . जुने रम्य दिवस आठवू लागले होते . जेजेच्या उरल्या सुरल्या निसर्ग सौन्दर्याच्या सान्निध्यात घालवलेल्या रम्य संध्याकाळच्या आठवणी मस्तकाभोवती फेर घालू लागल्या होत्या . कामाचे ‘डोंगर’ उपसणाऱ्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या कानावर त्यांनी तत्क्षणी आपल्या मनातले विचार कथन केले. तेही जुन्या सायबांच्याच तालमीत तयार झालेले . ‘त’ वरुन ताकभात ओळखणारे .
कामाचा पसारा आटोपून जोडगोळी जेजेतली सायंकाळ रम्य करण्यास निघाली. एव्हाना अंधार पडला होता . पण त्याची चिंता त्यांना कशाला ? सर्व ‘ व्यवस्था ‘ जवळपासच असल्यानं पाचच मिनिटात काम झालं . जवळचे दुकान देखील खूप जुने आणि खात्रीचा माल पुरवणारे त्यामुळे काळजी नव्हती . ‘तिखट’ चकण्याची देखील व्यवस्था झाली. सारा जामानिमा झाल्यावर पार्टी रंगणार नाही तर काय ? ती रंगलीच . जुन्या आठवणी निघाल्या . नव्या व्यवस्थेत काय भूमिका घ्यायची या बाबत बहुदा खल झाला . एव्हाना खूप रात्र झाली होती . मग साग्रसंगीत जेवण देखील झालं . एव्हाना खूपच उशीर झाला होता .आता इतक्या रात्री कुठे ट्रेन पकडून घरी जाणार ? म्हणून मग तिथंच राहायचा निर्णय झाला . ही काही पहिलीच खेप नव्हती . त्यामुळे अडचणीचं काहीच नव्हतं . अगदी मध्यरात्रीपर्यंत गप्पा रंगल्या . सुखदुःखाची देवाण घेवाण झाली . गप्पा इतक्या रंगल्या की रिकामी बाटली आणि ग्लासेस तसेच सकाळ होईपर्यंत पडून राहिले आहेत हे देखील उभयतांच्या काही लक्षातच आलं नाही . साहजिकच आहे . आणि आणि समजा आलेच कुणाच्या ध्यानी तर कोण काय यांचं वाकडं करणार ? ही गुर्मी आहेच की !
पुरावा हवाय ! जेजेचे सी सी टीव्ही फुटेज चेक करा की . समजा ते नाहीसं झालं असेल तर त्या प्रख्यात वाईन शॉपचं सी सी टीव्ही फुटेज चेक करा ! तारीख आणि वेळ आम्ही नक्कीच देऊ !
*****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion