No products in the cart.
जेजेत संगीत खुर्चीचा खेळ..
मुंबई, २७ नोव्हेंबर
ज्या शिक्षण संस्थेला युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननं नुकताच डिनोव्हो दर्जा दिला त्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेच्या प्रभारी अधिष्ठाता पदावरून डॉ संतोष क्षीरसागर यांची उचलबांगडी करुन त्या पदावर नागपूर येथील एक अधिव्याख्याता श्री रा वि गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी एक विशेष ज्ञापन काढून उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं ही कारवाई केली आहे असल्याचे कळते. ही कारवाई केली जात असताना प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा हे परदेशात गेले असल्याचे कळते इतकेच नाही तर जाताना त्यांनी कला संचालकपदाचा चार्ज जेजेचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्याकडे दिला असल्याचेही कळते.
संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे हा कारभार चालला असल्याची टीका कला वर्तुळातून केली जाते आहे. जेजेमध्ये चार्ज देण्यासाठीदेखील पात्र उमेदवार शिल्लक राहिलेले नाहीत असा जो आरोप ‘चिन्ह’ सातत्यानं करत आलं आहे तो खरा ठरला असल्याचे आता स्पष्ट झाल्यानं आता या साऱ्या प्रकरणाचीच नाही तर जेजेच्या आणि कला संचालनालयाच्या गेल्या तीस वर्षाच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून केली जाणार असल्याचे कळते.
उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या वेडगळ निर्णयांचा समाचार घेणारा विशेष लेख उद्या वाचा…!
Related
Please login to join discussion