No products in the cart.
‘कालाबाजार’ : आजही ताजा वाटतो कारण
‘कालाबाजार’ या अंकाची पीडीएफ परवा रात्री आम्ही www.chinha.in या आमच्या वेबसाईटवर टाकली आणि त्या संबंधीची घोषणा सर्व समाजमाध्यमांवर करताच कालच्या एका दिवसातच तब्बल ४००० पेक्षा अधिक वाचकांनी कालाबाजार अंक वाचण्यासाठी विक्रमी गर्दी केली. त्या सर्वच वाचकांचे अगदी मनापासून आभार.
काही वर्षापूर्वी म्हणजे २००८ – २००९ साली आम्ही जी ‘चिन्ह’ची वेबसाईट सुरु केली होती. तिला देखील वाचकांचा असाच प्रतिसाद मिळत होता. एकेका दिवशी अंक वाचायला ४० ते ५०,००० वाचक साऱ्या जगामधून ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर येत असत. गुगल स्टॅटिस्टिकमधून हा डेटा आम्हाला कळत असे. अनेक नवे देश या स्टॅटिस्टिकमधून आम्हाला ज्ञात झाले होते. अनेक वेळा एकेका लाखांपेक्षा अधिक हिट्स त्यावेळी ‘चिन्ह’ला मिळाल्या होत्या. ही सारी अर्थातच ‘चिन्ह’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराची किमया होती. हे वेगळं सांगायला नकोच.
कालांतरानं नवी वेबसाईट सुरु करण्याच्या नादात सदर वेबसाईट आम्ही बंद केली आणि नंतर व्यवहारात फसवलं गेल्यामुळं नव्यानं सुरु केलेली वेबसाईट बंद झाली ती झालीच. साहजिकच त्यानंतर ‘चिन्ह’चे अंक अपलोड करायचे राहून गेले ते गेलेच.
खूप मोठा कालखंड गेला. आता सारे सुरळीत होऊ घातले आहे. आता नव्यानं सुरु झालेल्या वेबसाईटमध्ये ‘कालाबाजार’ अंकाची पीडीएफ टाकून आम्ही पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली आहे. कालच्या पहिल्याच दिवसात तब्बल ४००० पेक्षा अधिक वाचकांनी गर्दी केली होती. त्यामुळं आम्हालाही हुरूप आला आहे. इथून पुढं ‘चिन्ह’चे आता पर्यंत प्रसिद्ध झालेले सर्व अंक या वेबसाईटवर टाकणार आहोत. इतकंच नाही तर जगभरातल्या कलारसिकांसाठी या अंकातील लेखांचे इंग्रजी अनुवाद देखील आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. जेणेकरुन महाराष्ट्रातील चित्रकार आणि त्यांच्यावरचं साहित्य जगभरातील कला रसिकांसाठी कायम स्वरुपातच या वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकेल. या संदर्भातील सर्व माहिती आम्ही समाजमाध्यमांवर प्रसारित करणार आहोत. कृपया आम्हाला या समाजमाध्यमांवर अवश्य फॉलो करा. ते अडचणीचे असल्यास पुढील लिंकवर क्लीक करुन ‘चिन्ह’च्या एकतर्फी किंवा ऍडमिन ओन्ली व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
आणि ‘चिन्ह’च्या प्रत्येक उपक्रमाची माहिती मिळवा.
– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion