No products in the cart.
कलासर्जन प्रदर्शन
रोटरी क्लब तर्फे पहिल्यांदाच नवी मुंबई भागात क्यूरेटेड चित्रकला प्रदर्शन आणि लिलावाचे आयोजन १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील २० पेक्षा अधिक चित्रकारांची शंभरहून अधिक चित्रे समाविष्ट आहेत. या प्रदर्शनातील चित्रांच्या लिलावातून जमा झालेली रक्कम सामाजिक संस्थेला दान करण्यात येणार आहे.
सध्याचा काळ हा फास्ट फूड, फास्ट फॅशन आणि फास्ट ग्रोथचा आहे. त्यामुळे मानसिक ताणाचं प्रमाणही वाढलं आहे. यावर मात करण्यासाठी अधिकाधिक सृजनशील गोष्टींमध्ये मन रमवणे अत्यावश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कला प्रदर्शनाचे आयोजन. सध्या नवी मुंबईतील कला रसिकांना जर चांगली कला प्रदर्शने बघायची असतील तर मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे हे प्रदर्शन नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील कलारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
कला रसिकांनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी असे आवाहन रोटरी क्लब, नवी मुंबई तर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनासंबंधी अधिक माहितीसाठी आयोजक एस. बालचंद्रन यांच्याशी +91 93242 94482 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
प्रदर्शनाचा कॅटलॉग खालील लिंकवर क्लीक करून बघू शकता.
KALASARJANA_Artisits Catalogue_Final
प्रदर्शनाचा पत्ता:
नेरुळ जिमखाना, सेक्टर 28, नेरुळ, नवी मुंबई – 400706
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion