News

कलावंत कला संचालकांसमोरचे प्रश्न !

‘कलाशिक्षण महाचर्चा’ पुन्हा सुरु !

‘चिन्ह’तर्फे काही महिन्यापूर्वी ‘कलाशिक्षण महाचर्चे’चे लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमानं कलाशिक्षण क्षेत्रात जागृती केली हे निश्चित. इतकंच नाही तर कलाशिक्षणासाठी जे पालक आपल्या पाल्याला पाठवू इच्छितात त्यांनी देखील हे कार्यक्रम आवर्जून पहिल्याचं कळतं. आता प्रदीर्घ विश्रांतीनंतर कला महाविद्यालयं सुरु झाल्यावर ‘चिन्ह’नं पुन्हा एकदा हे कार्यक्रम सुरु करण्याचं ठरवलं आहे. 

याच महिन्याच्या २४ तारखेला म्हणजे पुढच्या आठवड्याच्या शुक्रवारी सायंकाळी ०५.३० वाजता पहिला कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राला बऱ्याच काळानंतर कलावंत कलासंचालक लाभला असल्यामुळे त्यांच्या समोरच्या आव्हानांवरच आधारित असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ अभ्यासक्रमाला केंद्रीय संस्थांची मान्यताच नसणं, अभ्यासक्रमातील बदल, नवीन शैक्षणिक धोरणाशी सामना, डिप्लोमाचे कोर्सेस चालवणाऱ्या संस्थांचं भवितव्य, ग्रेड परीक्षांमधला नेचरचा गोंधळ, व्यावसायिक कामांचं वाटप, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, अनुदानित आणि विना अनुदानित कला महाविद्यालयांपुढील अडचणी, ९० टक्के की १०० टक्के ग्रांट आणि राज्यस्तरीय विद्यापीठ की डी-नोव्हो ) या साऱ्यांचा सामना नवे प्रभारी – कलावंत कला संचालक कसे करणार ? इत्यादी प्रश्न या कार्यक्रमात चर्चिले जाणार आहेत. ज्यांनी पाचव्या वेतन आयोगाचा लढा यशस्वी करून दाखवला ते कलाशिक्षण तज्ज्ञ शिरीष मिठबावकर या कार्यक्रमात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना देखील प्रश्न विचारून सहभागी होता येणार आहे. पुढील शुक्रवारी म्हणजे २४ जून रोजी सायंकाळी ०५.३० वाजता ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.