No products in the cart.
कलाश्री बर्वे यांच्या लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार !
डॉ. कलाश्री बर्वे यांच्या ‘ हॅपी इंडिपेंडन्स : देश आगे बढ़ रहा है’ या ‘कला विशारद’ प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या लघुचित्रपटाला ३० एप्रिल रोजी ‘ दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. नोएडा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात डॉ. बर्वे यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं आहे.

कलाश्री बर्वे यांच्या हा लघुचित्रपट एका ७५ वर्षीय राष्ट्रप्रेमीवर आधारित आहे, ज्याने स्वतंत्र भारत तयार होत असतानाच प्रत्येक महत्वाचा क्षण त्यानं अनुभवला आहे. त्यातल्या प्रत्येक पैलूंचे ते साक्षीदार झाले होते. ते गृहस्थ आजही आपल्या नातवंडांना आपल्या देशाची प्रगती, आपल्याकडची मूल्य शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनात भारताबद्दल जेवढा आदर आहे तेवढाच तो त्यांच्या नातवंडांच्या मनात देखील रुजावा अशी त्यांची यामागची तळमळ दिसून येते. हा चित्रपट अवघ्या पाच दिवसात आणि तोही अत्यंत मर्यादित खर्चात तयार केला असून या चित्रपटाची निवड मुंबई आणि पुणे शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील झाली असल्याचे डॉ. कलाश्री बर्वे यांनी सांगितले.

या चित्रपट निर्मितीमागे अनेक हात आहेत. जेजेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या कलाश्री या त्या चित्रपटाच्या लेखिका, दिग्दर्शक असून या चित्रपटाची संकल्पना देखील त्यांचीच आहे. चित्रपटातील कलाकार रवींद्र चोप्रा, ओजस बर्वे, प्रतिष्ठा गायकवाड, जीवल गायकवाड, मंगेश बर्वे या सर्वांची त्यांना अभिनयासाठी साथ लाभली. त्यांच्या या कमालीच्या यशासाठी ‘चिन्ह’तर्फे शुभेच्छा ! या लघुचित्रपटाचा टीझर बातमीसह देत आहोत.
[video width="500" height="310" src="https://chinha.in/wp-content/uploads/2022/06/Happy-Independence-Teaser.mp4" /]
Related
Please login to join discussion