No products in the cart.
‘कसोटी विवेकाची’ संभाजीनगरमध्ये
फ्रेंड्स ऑफ दाभोळकर आणि परिवर्तन संस्था निर्मित ‘कसोटी विवेकाची’ या प्रदर्शनाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील कला दीर्घा आर्ट गॅलरी येथे दि ०९ ते १४ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातील कलाकृती तयार केल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन लेखक आणि नाटककार अरविंद जगताप यांच्या हस्ते दि ९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता होणार आहे.
मुंबईतील काही पत्रकारांनी मिळून ‘फ्रेंड्स ऑफ दाभोळकर’ हा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. या माहितीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी दाभोळकर यांचे जीवन आणि कार्य यावर समर्पक कलाकृती तयार केल्या आहेत. या कलाकृतीमध्ये इन्स्टॉलेशन, पेंटिंग, कॅलिग्राफी अशा विविध माध्यमातील कलाकृतींचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर नंतर हे प्रदर्शन नाशिक येथे आयोजित करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये प्रदर्शन फिरते राहील अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीपाल ललवाणी यांनी दिली.
******
Related
Please login to join discussion