No products in the cart.
डोंबिवलीत किशोरीताई आमोणकर महोत्सवाचे आयोजन
कला रसिक आणि दृश्यकला अभ्यासक गणेश मनोहर कुलकर्णी हे ‘चिन्ह’च्या चोखंदळ वाचकांपैकी एक आहेत. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत ते अनेक कला विषयक कार्यक्रम उत्साहाने आयोजित करत असतात. दोन महिन्यापूर्वी चित्रकार प्रभाकर कोलते आणि लेखिका, चित्रकार उमा कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. 03 एप्रिल हा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त गणेश मनोहर कुलकर्णी परिवार आणि इंद्रधनुष्य फाउंडेशन यांच्यातर्फे दि 08 एप्रिल 2023 रोजी डोंबिवली येथे किशोरी आमोणकर स्मृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात गोव्यातील प्रसिद्ध गायक डॅा. प्रविण गांवकर पहिल्या सत्रात आपले गायन सादर करतील. त्यांना सारंगीवर संगीत मिश्रा, तबल्यावर कौस्तुभ दिवेकर आणि पेटीवर सुधांशु घारपुरे साथ करणार आहेत. तर दुसऱ्या सत्राची सांगता स्वरप्रज्ञ पं.मिलिंद रायकर यांच्या सुरेल व्हायोलिन वादनाने होणार आहे, त्यांना तबल्यावर पं.बाळकृष्ण अय्यर साथ करणार आहेतच शिवाय अनेक वर्षे सहवास लाभलेल्या किशोरीताईंच्या आठवणी पण सांगणार आहेत.
या कार्यक्रमाला रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. कार्यक्रम संध्याकाळी 05:00 वाजता सुरु होईल.
*****
कार्यक्रम स्थळ :
ब्लॅासम शाळा,स.वा.जोशी शाळेचे आवार,नेहरू रोड, डोंबिवली (पूर्व).
Related
Please login to join discussion