No products in the cart.
ललित कला अकादमीच्या छायाचित्र प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी
ललित कला अकादमी, दिल्ली येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “आझादी का अमृत महोत्सव” या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी छायाचित्र (फोटोग्राफ्स) माध्यमातील कलाकृती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून २५ वर्षांवरील कोणीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतात.
छायाचित्रासाठीचे विषय
- Freedom struggle sites of india
- Heritage sites of india
- Fort & Monuments of india
- Ancient temples of India
- Freedom to photograph
अटी व नियम पुढील प्रमाणे आहेत :
• फोटोची साईझ 20 बाय 30 इंच असावी.
• स्पर्धकांचे वय 25 वर्षेपेक्षा जास्त असावे.
• फोटोचे रेसोल्यूशन 300 डीपीआय असावे.
• पाचपेक्षा जास्त फोटो पाठवू नयेत शिवाय फोटो हे JPEG या फॉर्मटमध्ये असावे.
या प्रदर्शनसंबंधी अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट दयावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdBdW9GatAvSlC4aTSMwwlMlE_i90NU_cofq9LdLHxaMv5jwQ/viewform?usp=sf_link
Related
Please login to join discussion