No products in the cart.
अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे लँडस्केप स्पर्धेचे आयोजन
पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे लँडस्केप आणि रेखाटन स्पर्धेचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खाली असून नोंदणी शुल्क १०० रुपये आहे. स्पर्धेची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी ४ वाजता त्याच दिवशी बक्षीस वितरण होईल. प्रथम पारितोषिक एकवीस हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे तर द्वितीय बक्षीस हे १५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. तृतीय पारितोषिक हे १० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असून दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक हौशी कलाकारांनी भाग घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. नवनाथ क्षीरसागर यांच्याशी ९७३०२५३२९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Related
Please login to join discussion