No products in the cart.
आर्ट इंडियाचा ताजा अंक प्रसिद्ध !
आर्ट इंडियाचा ताजा अंक डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झाला आहे. २०२२ मधील हा दुसरा अंक असून या अंकाच्या मुखपृष्ठावर रीना सैनी कल्लट यांच्या कलाकृतीला स्थान मिळाले आहे. या अंकासाठी पूजा सावनसुख, सुरेश जयराम, नजरीन इस्लाम आणि उमेश कुमार यांनी लेखन केले आहे. पूजा सावनसुख यांची कव्हर स्टोरी दृश्यकलेत बाग बगीचे यांचे जे रेखाटन येते त्यांच्या प्रतीकात्मक अर्थावर भाष्य करते. या लेखात उदाहरण म्हणून समकालीन चित्रकारांच्या चित्रांचा समावेश केला आहे. नजरीन यांनी बांगलादेशी कलाकारांच्या चित्रकृतींचा आढावा आपल्या लेखातून घेतला आहे.
आर्ट इंडियाच्या अंकाचं वैशिष्टय म्हणजे पानापानावर चित्रांचे फोटो असतात. यातून दृश्यात्मक आनंद घेता येतो. आर्ट इंडिया हे मॅगझीन कदाचित उच्चभ्रू वर्तुळापुरतं असावं असं वाटत याला कारण म्हणजे लेखांमधील किचकट भाषा. असं असलं तरी आर्ट इंडिया मॅगझिनची वार्षिक वर्गणी अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे. यात हार्ड कॉपी आणि डिजिटल या दोन्ही स्वरूपातील पर्याय उपलब्ध आहेत. हार्ड कॉपी सब्स्क्रिप्शनमध्ये वर्षाचे चार अंक ११२० रुपयांमध्ये मिळू शकतात. अंकातील चित्रे आणि उच्च दर्जाची छपाई लक्षात घेता ही किंमत अत्यंत रास्त वाटते.
डिजिटल सब्स्क्रिप्शन हे अवघ्या २५० रुपयात मिळते. पण याचा अनुभव अत्यंत वाईट आहे. डिजिटल अंक वाचताना अनेक समस्या येतात. अंक लोड व्हायला (इंटरनेट वेगवान असलं तरी ) खूप वेळ लागतो. फॉन्ट साईझ छोटी असल्याने झूम करून वाचताना खूप दमछाक होते. त्यामुळे आर्ट इंडिया जर्नलच्या संपादकांना विनंती की त्यांनी अंक सरळ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून द्यावा. किंवा वेबसाईट एक्सपेरिअन्स हा युझर फ्रेंडली करावा.
हे सगळे दोष काढून टाकले तर कला क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्ट इंडिया जर्नल हे एक उत्तम संशोधन साधन आहे.
****
Related
Please login to join discussion